दीपावली सुट्टीला जाता जाता महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा, वडूजच्या विद्यार्थ्यांनी साकारला किल्ले राजगड आणि स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा जिवंत देखावा..
प्रतिनिधी -विनोद लोहार
वडूज शिक्षण विकास मंडळ, वडूज संचलित महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी किल्ले राजगडची प्रतिकृती शाळेत तयार केली. सोबतच स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा हा जिवंत देखावा या बाल कलाकारांनी सादर केला.
दीपावली सुट्टी अगदी उद्यावर येऊन ठेपली असतांना इयत्ता 1 ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नुकतीच सत्र 1 परीक्षा पार पडली. यानंतर विद्यार्थी या नवोपक्रमात गढून गेले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर अशी शुभ दीपावलीची भेटकार्ड तयार केली, मातीपासून डिझाईनच्या पणत्या तयार केल्या.
या सर्व वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
प्रमुख आकर्षण किल्ले राजगड प्रतिकृतीने उपस्थितांची मने जिंकली.अतिशय नयनरम्य राजगड, त्याखालील गावे,माणसे, जनावरे गडावरील माची, मंदिर, बुरुज,शिपाई, पायथ्यातून वाहणारी नदी,विहीर,हिरवळ या सर्वांवरून उपस्थितांची नजर हटत नव्हती.
स्वराज्यस्थापनेचा जिवंत देखावा यामध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन पोशाख परिधान केलेले मावळे त्यांची नाट्यमय संवाद फेक आणि इयत्ता तिसरीतील शिवश्री भोंडवे या विद्यार्थिनीची गारद या बाबी लक्षवेधक ठरल्या.
उपस्थित मान्यवर आणि पालक वर्ग यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक झाले.मुलांना संस्कार देणारा, त्यांच्यात राष्ट्रभक्ती रुजवणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला.
या नवोपक्रमाला सन्मा. संचालक डॉ. हेमंत पेठे, श्री. अशोक भंडारे, श्री. प्रशांत शेटे, हुतात्मा संकुलाचे प्राचार्य श्री. एस. आर. जाधव सर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.डॉ. पेठे यांनी मुलांना
मार्गदर्शन करतांना छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. ते राखणे आणि त्याचे सुराज्य घडवणे हिच नव्या पिढीची महत्वाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.
हा नवोपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका शितल शिंदे सहा. शिक्षक वृंद विजया खराडे, अशितोष गवळी, सतिश पवार,सुवर्णा लोहार,सुजाता जाधव,मनीषा खाडे,शिवानी पवार
शिक्षकेतर कर्मचारी मीनल देशपांडे, दिपाली टाकणे,पिंकी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

