माण तालुक्यातील तुपेवाडीत धडक छापा ,शेतात गांजा पेरला आणि गेम फसला गांजा जप्त !
म्हसवड (प्रतिनिधी) : अवैध गांजा लागवडीवर सातारा पोलीस आणि म्हसवड पोलीस स्टेशनने संयुक्त धडक छापा टाकला. वरकुटे ता. माण, तुपेवाडी येथील शहाजी दाजी तुपे यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती, अशी खात्रीशीर माहिती पोलीसांना त्यांच्या विशेष बातमीदारांकडून मिळाली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि म्हसवड पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ शेताच्या दिशेने रवाना झाले. छाप्यात ४० किलो ओला गांजा, ज्याची बाजारात किंमत १०,११,९५० रुपये, जप्त करण्यात आली.झाडांवरील हिरवट पाने, फुले, बारीक काड्या व बीज यासह ओलसर पाने सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आले. सदर कारवाईसाठी पोउनि विश्वास शिंगाडे, सपोनि अक्षय सोनावणे, रोहित फार्णे, अनिल वाघमोडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अंमलदार आणि फॉरन्सीक टीम उपस्थित होते. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकातील पोलिसांचे कौतुक केले आणि सांगितले की अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सातारा जिल्ह्यात अखंड सुरू सदर छाप्यामुळे स्पष्ट झाले की पोलीस सतर्क असून अवैध औषधांचा व्यापार थांबवण्यासाठी कोणालाही सुटणार नाही. पोलिसांनी जनतेला ह्या प्रकरणाद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की, गांजा पेरल्यास किंवा अवैध व्यवसाय केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
Spread the love मायणी प्रतिनिधी—- फलटण तालुक्यातील स्वयंभू दत्त मंदिर खामगाव येथील मठाधिपती महंत उमेशानंद महाराज यांच्यावर महा कुंभ प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यात […]
Spread the loveम्हसवड दि. ७म्हसवड प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदी महेश कांबळे यांची तर उपाध्यक्ष पदी सचिन सरतापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.जेष्ठ पत्रकार विजय […]