फेक मोबाईल कॉल, व्यापाऱ्यासाठी डोकेदुखी,

Spread the love


म्हसवड…प्रतिनिधी
ऐन सणासुदीच्या कालावधीत म्हसवड परिसरात फेक मोबाईल कॉल द्वारे व्यापारी व व्यवसायिकांना अमुक ठिकाणी साहित्य, वस्तू पाठवा मी माल उतरण्या अगोदर तुमचे पेमेंट देतो असे म्हणून अज्ञात व्यक्तीकडून व्यापारी व व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
व्यवसायाने मिस्त्री राकेश कुमार नावे असणाऱ्या मोबाईल वरून सदर फेक कॉल व्यापारी व व्यवसायिकांना येत आहेत. अधिक चौकशी केली असता त्याचे बँक खाते नवी दिल्ली येथे येस बँकेत असल्याचे दिसून येत आहे. विविध बांधकाम व्यवसायिक, दुकानदार, व्यापारी यांना 7304885051, 9784797706 , व 8797726746 या कॉल वरून फोन येत आहे. फोनवरून व्यापाऱ्यांना अमुक साहित्य या ठिकाणी पाठवा, दोन रुपये जास्त घ्या मात्र साहित्य तातडीने पाठवाअशी बतावणी अज्ञात व्यक्ती करीत आहे. तुम्हाला जागेवरच पैसे देतो त्याशिवाय साहित्य उतरू नका असे सांगत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी माल अथवा साहित्याची गाडी गेली असता प्रथम तुम्ही मला ऑनलाईन एक रुपया पाठवा, मी तुम्हाला साहित्याचे पैसे पाठवतो असे सांगितले जात असून प्रत्यक्ष त्या ठिकाणी ती व्यक्ती उपस्थित नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे संबंधित ठिकाणी विना खात्रीकरता गेलेल्या व्यापारी व्यवसायिकांना त्याबाबत कटू अनुभव आला आहे. म्हसवड परिसरातील लोखंड, सिमेंट,ग्रॅनाईट, वीट, इलेक्ट्रिक साहित्य तसेच रोलिंग शटर व्यवसायिकांना फेक फोन करून मोकळा व खर्चिक हेलपाटा मारण्याची फसवणूक संबंधित अज्ञातांकडून केली आहे. फेक मोबाईल फोन प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश शेतकरी सेना उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी अर्जाद्वारे म्हसवड पोलीस स्टेशन येथे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!