
म्हसवड दि. १२
स्वच्छ शहर, सुंदर शहर असे बिरुद डोक्यावर घेवुन स्वच्छतेचा डंका जिल्हाभर पिटणार्या म्हसवड नगरपालिकेच्या सार्वजनिक शौच्छालयाची दुरावस्था पाहता याठिकाणी नक्की प्रशासन वा स्वच्छता विभाग कार्यरत आहे का हा प्रश्न सर्वांनाच पडल्याशिवाय राहत नसुन शहर स्वच्छतेविषयी पालिका प्रशासनाची उदासिनदा का ? असा प्रश्न सर्वसामान्य म्हसवडकरांना पडलेला आहे.
शहर स्वच्छतेचा डांगोरा पिटणार्या म्हसवड पालिकेने शहरातील स्वच्छतेसाठी प्रतिमहिना लाखो रुपयांचा ठेका दिलेला असला तरी शहरातील मुख्य रस्ते वगळता इतर ठिकाणच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत, तर शहरातील सार्वजनिक शौच्छालयातील अवस्था ही न सांगण्यासारखीच आहे, येथे शौच्छविधीस गेलेली व्यक्ती ही व्यवस्थित बाहेर येईल याची शाश्वती नाही, ती व्यक्ती या शौच्छालयात गेल्यास ती त्याच ठिकाणी बेशुध्द होवुन पडेल की काय अशी अवस्था आहे. सार्वजनिक शौच्छालयात साफ सफाई केली जाते की नाही असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
सार्वजनिक शौच्छालयात पाणी नाही तर दरवाजेही नाही त्यामुळे शौच्छालयात बसणार्यास उघड्यावर शौच्छविधीस बसल्याचा प्रत्यय येतो. यापुर्वी उघड्यावर शौच्छविधीस बसणार्यावर पालिकेकडुन दंडात्मक कारवाई केली जात होती. आता नागरीकांमध्ये याबाबत चांगलीच जागृती झाल्याने पालिका हद्दीत घरोघरी शौच्छालये निर्माण झाली आहेत त्यामुळे सार्वजनिक शौच्छालयात जाणारे घटक हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, हा घटक जरी दुर्बल असला तरी हा घटक सुध्दा शहराचा नागरिक आहे, तो वर्ग ही पालिकेचा करदाता आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना सोयी सुविधा देणे हे पालिकेचे कर्तव्यच आहे. मात्र याच कर्तव्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सार्वजनिक शौच्छालयात जाणारा सामान्य व्यक्ती असल्यानेच पालिका त्यांच्या बाबतीत गंभीर नाही का ? असा सवाल ही या वर्गातुन विचारला जात आहे.
पालिका दर महा शहर स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करीत असली तरी ही स्वच्छता नेमकी कोठे व कोणाची केली जाते हा प्रश्न येथील चित्र पाहिल्यास निर्माण होत आहे. पालिका हद्दीतील सर्वच सार्वजनिक शौच्छालयाची अतिशय दैयनिय अवस्था झाली असुन ही अवस्था केवळ पालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षा मुळे झाली आहे. नागरीकांकडुन पालिका जसा कर घेते तसे नागरीकांना सुविधा ही देणे ही बंधनकारकर आहे, मात्र सामान्यांच्या सुविधेकडे कोण लक्ष देणार, अशा सार्वजनिक ठिकाणी ना राजकिय नेते, ना प्रशासकीय अधिकारी शौच्छास जात नसल्यानेच याठिकाणच्या अडचणी, येथे जाणार्यांची घुसमट त्यांच्या लक्षात येत नाही. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवुन नागरीकांचे आरोग्य बिघडणार नाही याची खबरदारी घेवुन नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी जोरदार मागणी म्हसवडकर नागरीकांतुन होत आहे.
पालिका विरोधात आंदोलन करणार – माजी उपनगराध्यक्ष सरतापे –
म्हसवड शहरातील नागरीक हे खुप सोशीक जरी असले तरी ते षंड नक्कीच नाहीत पालिका प्रशासनाने सार्वजनिक शौच्छालयाची अतिशय दैयनिय अवस्था असतानासुध्दा याकडे दुर्लक्ष करुन नागरीकांना एकप्रकारे वार्यावर सोडले आहे, पालिका प्रशासन हे बड्यांच्या मागेपुढे करीत असुन सामान्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे पालिका प्रशासनाने शहरातील सर्वच सार्वजनिक शौच्छालयाची स्वच्छता करुन त्याठिकाणी पाण्याची व दरवाजे बसवावेत अन्यथा आपण पालिका प्रशासनाच्या विरोधात २६ जानेवारी पासुन बेमुदत आंदोलन सुरु करु असा इशारा म्हसवड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनी दिला आहे.
फोटो –