
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
आज-काल वाढत चाललेल्या रस्ते अपघातांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे अनेक ठिकाणी वाहन चालकांची कमी होणारी जागरूकता आणि रस्त्यावरील अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे रस्त्यांवर असणाऱ्या विविध पुलांच्या ठिकाणी संरक्षक कठड्यांची गरज दिवसेंदिवस अधिक महत्त्वाची होत आहे.सध्या घाटमाथा ते औंध रस्त्याचे काम सुरू असून पहिल्यापेक्षा रस्ता आता सपाट व गुळगुळीत झाला आहे त्यामुळे वाहनांना वेग मर्यादा राहिलेली नाही.
घाटमाथा ते औंध या रस्त्यावर आजपर्यंत बरेच अपघात झालेले आहेत परंतु रस्त्याचे काम करणारे संबंधित ठेकेदार, बांधकाम विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न सध्या नागरिकां मधून उपस्थित होत आहे. नांदोशी जवळ असणाऱ्या ओढ्यावर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावर एकाच ठिकाणी संरक्षक कठला असून दुसऱ्या बाजूस संरक्षणाच्या दृष्टीने लोखंडी बार किंवा संरक्षक कठडा नाही. महाबळेश्वर ते विटा असणाऱ्या या राज्य मार्गावर अलीकडच्या काळात वाहतूक वाढली असून वाहनांचा वेग ही मर्यादित राहिलेला नाही सपाट व गुळगुळीत रस्त्यांवर भरदाव वेगाने येणारी वाहने आणि या पुलावर असणारे वळण यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे या पुलावर मजबूत असे संरक्षक कडे किंवा लोखंडी बार उभे करून उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे
चौकट: नांदोशी पुलावर संरक्षक कठडे करून उपाययोजना केल्यास हा रस्ता अधिक सुरक्षित होईल आणि अपघात होणार नाहीत तसेच दिशादर्शक फलक लावण्याची जास्त गरज आहे यामुळे अपघातांमध्ये घट होऊन यावर नियंत्रण मिळवता येईल आणि सुरक्षिततेचा स्तर वाढवता येईल.
विनोद पाटील, नांदोशी
अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना खटाव तालुका.