
सातारा (अजित जगताप)सातारा शहरात आज दुपारी फेरफटका मारताना एक लाडकी बहीण पोटासाठी भर उन्हात फिरत होती. बिचारीला शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. आपलाही कुणीतरी फोटो काढेल अशी अपेक्षा नव्हती. कारण, आता सर्वच जग व्यावसायिक झालेले आहे. अशावेळी पोटासाठी झटणाऱ्या माता-भगिनीकडे कोण लक्ष देणार? याची फसटशील कल्पना नव्हती.
शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील अशी परिस्थिती दिसून आली. कारण, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले वाक्य तिच्यापर्यंत पोहोचवण्यास अपयश आले आहे. असेच म्हणवे लागेल…
(छाया – अजित जगताप, सातारा)