म्हसवड.. प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे पाल्याच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय जोपासत असणाऱ्या कष्टकरी पालक महिलांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड अंतर्गत च्या क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा, नूतन मराठी शाळा व आत्मकिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर होत्या. प्रमुख मान्यवर म्हणून संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर , मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव, तसेच संकुलातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे जिगरबाज, ध्येयवादी,कष्टकरी व जीवनातील संकटात संघर्षाच्या माध्यमातून धाडस दाखवणाऱ्या माधुरी पिसे, रोहिणी बाड, निशा पिसे, सारिका वसेकर व सुनंदा ढगे या पालक महिलांचा यथोचित सत्कार संस्था सचिव सुलोचना बाबर यांचे हस्ते करण्यात आला. तर क्रांतीवीर शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका व शाळेचे नाव दर्जेदार शैक्षणिक उपक्रमशीलतेच्या माध्यमातून अनेक वेळा राज्यस्तरावर पोहोचवणाऱ्या सुलोचना बाबर यांचा सत्कार उपशिक्षिका मेघा मोरे व साधना दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
आदर्श पालक सत्कारमूर्ती सुनंदा ढगे, सारिका वसेकर, निशा पिसे ,रोहिणी बाड, व माधुरी पिसे यांनी अत्यंत हृदय द्रावक व भावनिक मनोगत व्यक्त अडचणीच्या कालावधीत सहकार्य केल्याबद्दल व शैक्षणिक संकुलातर्फे केलेल्या सन्मानाबद्दल ऋण व्यक्त केले.
संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, यांनी महिलांचा सन्मान, व विविध क्षेत्रातील महिलांनी घेतलेली भरारी इत्यादी बाबत प्रेरणात्मक मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी महादेव बनसोडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली माने, जागृती माने, प्रांजल लुबाळ, संग्राम ढवळे, व आयुध धावड यांनी मनोगत व्यक्त करून महिलांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका प्रतिमा कोळेकर तर उपस्थितांचे आभार ऋचा सिनगारे या विद्यार्थिनीने केले.

(क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात महिला दिनानिमित्त कष्टकरी पालक महिलांचा सन्मान करताना मुख्याध्यापिका सुलोचना बाबर)