महिलादिनी लोधवडे प्राथ.शाळेत महिलांच्या कार्याला सलाम

Spread the love


गोंदवले – विविध उपक्रमांनी साजरा झाला महिलादिन
जागतिक महिला दिनाला कर्तबगार महिलांचे सर्वत्र कौतुक करण्यात येते.असाच एक शाही महिला सन्मान सोहळा हा सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक प्रामाणिक,उपक्रमशील,होतकरू
व आदर्श तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या उत्तम अशा कार्य कुशल नियोजनातून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राज व वीर जिजामाता तसेच ज्ञान आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवर महिलांच्या शुभ हस्ते पूजन केले व त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी लोधवडे गावाच्या उपसरपंच मा.वैशालीताई देशमुख,सदस्या उषा जगताप,पूजा मोरे,रसिका शिंदे,समाजसेविका त्रिवेणी मोरे,आरोग्य सेविका धनश्री गायकवाड,शिक्षिका सुचिता माळवे,संध्या पोळ व अश्विनी मगर,अंगणवाडीताई पुष्पा जाधव, वर्षा जाधव,अर्चना माने, विद्या कदम व पूनम अवघडे,मदतनीस शारदा काशिद,अर्चना चोपडे,अश्विनी चोपडे,सोनाली काळोखे,दीपिका काटकर आशा वर्कर मंगल शिंदे,मनिषा जगताप आदि.महिला भगिनींनचा व कर्तबगार विद्यार्थ्यानी कु.दृष्टी सुनिल मोरे हिचाही यावेळी लोधवडे प्राथ.शाळेत शाल,श्रीफळ, पुष्प बुफे व गुच्छ देऊन त्यांचा कार्य गौरव करीत या सर्वांना सतेशकुमार माळवे सरांनी सन्मानित केले.
त्यानंतर उपस्थित महिला भगिनींना व विद्यार्थ्यांना आरोग्य सेविका धनश्री गायकवाड यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.तसेच सतेशकुमार माळवे सरांचे त्यांच्या तेजस्वी वाणीतून बेटी बचाओ बेटी पढाओ,स्त्री जागृती,महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण,स्त्री पुरुष समानता व एकविसाव्या शतकातील स्त्रियांपुढील आव्हाने आणि समस्या यांसारख्या विविध विषयांवर फोकस आणि मार्गदर्शन करणारे जबरदस्त व्याख्यान झाले.
यानंतर कराटे प्रात्यक्षिके,लाटी काठीचे खेळ,संगीत खुर्ची खेळ व फणी डान्स गीतांचे सादरीकरण आदि.उपक्रम शाळेतील मुलींसाठी ह्या महिला दिनी घेण्यात आले. यामध्ये शाळेतील सर्व मुलींनी मन मुराद आनंद घेतला.या दिवशी शाळेतील मुलींनी कर्तबगार महिलांचे पेहराव करणारे पोशाख परिधान केले होते. जिजामाता,सावित्रीबाई, रमाबाई, इंदिरा गांधी,कल्पना चावला,राजमाता आहिल्यादेवी होळकर,झाशीची राणी,ताराराणी, सिंधूताई सपकाळ, डॉक्टर, इंजिनिअर आदी कर्तबगार महिलांच्या साकारलेल्या या सर्व व्यक्तिरेखा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.
महिला दिनाच्या वरील सर्व उपक्रमांचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख शोभा पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे,उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे व सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक महादेव ननावरे,शिक्षक दिपक कदम व सर्व शिक्षकवृंद,बहुसंख्य पालक व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.


छाया – महिलांचा सन्मान करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!