सातारा जिल्ह्यात भाजपचे उमेदवार पाच ठिकाणी जिंकण्याची शक्यता.

Spread the love

 

सातारा वार्ताहर —
आठ मतदार संघात चार भाजपचे उमेदवार जिंकणार ,तर तीन राष्ट्रवादी, व एक राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार जिंकणार अशी शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात सरासरी 72 टक्के मतदान
फलटण तालुक्यामध्ये 71.8 वाई तालुक्यामध्ये 67.58 कोरेगाव तालुक्यामध्ये 77.74 मान तालुक्यामध्ये 71 टक्के कराड उत्तर 74.67 कराड दक्षिण 76. 26% पाटण तालुक्यामध्ये 73.25% सातारा तालुका 63.52%
असे एकूण मतदान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेले मतदान हा मतदानाचा कौल कोणत्या बाजूला जाणारी याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं वातावरण आहे असं तज्ञांचे मत आहे खरं पाहता सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरचंद्र पवार गट अधिक प्रभावी असला तरी सुद्धा या वेळेला या जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेत असतात विविध भागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मुसंडी मारलेली दिसत आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारांमध्ये एकसंघता दाखवलेली होती यामुळेच की काय सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अधिक प्रमाणात निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे मात्र तज्ञाचे मत जरी असले तरी विविध ठिकाणच्या मतदारांचा कौल पाहता शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी केलेला प्रचार व त्यांची प्रचारामध्ये मुसंडी एकूणच या निकालावर परिणाम करणारी अशी आहे .
जे उमेदवार आहेत या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती दिसून येत असल्या तरी माण, फलटण आणि त्याचबरोबर कोरेगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची लढत झालेली दिसून येत आहे
कोरेगाव मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार महेश शिंदे व माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झालेली आहे .
या चुरशीच्या लढतीमध्ये दोघांनाही या विजयाच्या संधी उपलब्ध आहेत मात्र प्रत्यक्ष मतदाना झालेल्या दिवसाच्या विचार करता दोन्ही गट अतिशय प्रभावीपणे आपण जिंकणार आहे असा दावा करीत आहेत .
माण तालुका मतदारसंघांमध्ये आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यामध्ये चुरशीचा सामना झालेला आहे यामध्ये दोन्ही गटांनी आपल्या विजयाचा दावा केला असला तरी माण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी विकासावर निवडणूक लढवल्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार गोरे यांना मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसून येत आहे .
माण तालुक्यातील विविध गटाचे नेते एकत्र आलेले होते यामुळे ही निवडणूक अटीतटीची झालेली होती.
तर दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी उबाठा शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन आमदार जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिल्यामुळे या मतदारसंघांमध्ये मताधिक्य वाढण्याची शक्यता वाढलेली आहे.
त्याचबरोबर खटाव तालुक्याचे नेते व माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांच्या सहकार्यामुळे खटाव तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता वाढलेली आहे .
खटाव तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते जोमाने काम करीत असल्यामुळे खटाव तालुक्यामध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांना मताधिक्य मिळू शकतं.
असं मत व्यक्त करण्यात येत आहे तर दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी मोट बांधून एकत्रपणे निवडणुकी लढवलेली आहे .
गेल्या निवडणुकीमध्ये तिरंगी चौरंगी झालेले निवडणूक या वेळेला दुरंगी करण्याचा प्रयत्न शरचंद्र पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांना या निवडणुकीमध्ये अधिक संघर्ष करावा लागलेला आहे .
हे पाहता विरोधी गटांमध्ये सुद्धा विजयाची खात्री देत आहेत .
मात्र प्रत्यक्ष मतदान कोणाला झालं याबाबत निकालानंतरचा अंदाज बांधू शकतो याचबरोबर दक्षिण कराड भागामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला असणारा हा दक्षिण कराड मतदारसंघांमध्ये त्यांना मताधिक्य मिळेल असं बोललं जात आहे .
उतर कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील यांना विजयाची खात्री दिसत आहे.

सातारा जावली मतदारसंघांमध्ये शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून अमित कदम हे शरचंद्र पवार गटामधून निवडणूक लढवीत आहेत .
या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयाची खात्री लोकांकडून व्यक्त केली जात आहे

वाई मतदारसंघांमधून मकरंद आबा पाटील यांच्या विजयाची खात्री देण्यात येत असल्यामुळे या भागामध्ये त्यांना मता देखील मिळेल अशी शक्यता आहे.
फलटण येथे माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक असणारे आमदार दीपक चव्हाण यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे
पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांना काठावरचा विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे .
दक्षिण कराड मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत झाली असून इथं पण भाजपचा उमेदवार असणारे मनोज घोरपडे यांनी मोठं आव्हान निर्माण केले आहे. येथे बाळासाहेब पाटील यांचं पारडं जड झाले आहे.
मात्र प्रत्यक्षात निकाला दिवशी ह्याचं चित्र स्पष्ट होणार असून भारतीय जनता पार्टी एकूण आठ पैकी चार ठिकाणी विजयाची शक्यता अधिक असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाच ठिकाणी जिंकण्याची शक्यता वाढलेली आहे .

मात्र फलटण , व कराड उत्तर दोन ठिकाणी शरचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी होतील. तर राष्ट्रीय काँग्रेस चे पृथ्वीराज चव्हाण विजय मिळवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र हे जरी अंदाज असले तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी चुरशीची लढत झाली असून विजय मात्र कोणाचा होणार याबाबत शंका निर्माण झालेले आहेत.

वाई मकरंद पाटील, सातारा शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव महेश शिंदे,माण जयकुमार गोरे, भाजपचे उमेदवार जिंकणार.?
पाटण शंभुराजे देसाई राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे गटाचे विजय शक्यता,
कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेस चे नेते विजय होण्याची शक्यता आहे, दक्षिण कराड बाळासाहेब पाटील, फलटण दिपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी होतील अशी शक्यता आहे…

…..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!