
–मिलिंद काळे महाबळेश्वर
सध्या राज्यात विधान परिषी परिषदेचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात व मतदार संघात विविध राजकीय पक्षाची उमेदवारी अर्ज दाखल झाले. २५६ वाई विधानसभा मतदारसंघात महायुती (अजित पवार )गटातून उमेदवारी मिळाल्यानंतर विद्यमान आमदार व उमेदवार मकरंद जाधव पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली. एकेकाळी आपले सहकारी मित्र असणारे, शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्यासोबत आमदारकीच्या खुर्चीची स्पर्धा सुरू झाली. अरुणा देवी पिसाळ महाविकास आघाडी (शरदचंद्र पवार गट) कडून तर दुसरीकडे महायुती अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार व उमेदवार मकरंद आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी आपल्या परीने मतदार संघाचा प्रचार व मतदानाचा हक्क बजावण्याची मतदार राजाला विनंती केली. तीन आठवड्यापासून चालू असलेल्या प्रचाराच्या तलवारी १८ नोव्हेंबरला म्यान झाल्या २०नोव्हेंबर २०२४ रोजी २५६ वाई मतदार संघामध्ये मधील असणाऱ्या महाबळेश्वर शहरांमध्ये विविध शाळेमध्ये चार मतदान केंद्र तर 16 मतदान खोल्या उपलब्ध केल्या होत्या. या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक अधिकारी स्वतः शहरातील प्रत्येक निवडणूक केंद्रावर भेट दिली. मतदान प्रक्रियेत भागघेणारे अपंग, वृद्ध ,महिला व पुरुष यांना मतदान खोलीपर्यंत ने आण करण्यासाठी,नगरपालिका प्रशासक श्री योगेश पाटील यांच्या आदेशाने नगरपालिकेचे मुख्यालिपीक आबाजी ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.२० नोव्हेंबर बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक केंद्रावरती मतदारांची गर्दी बघायला मिळत होती. सर्वच राजकीय पक्ष व नेते आपल्या कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते.सकाळच्या पहिल्या सत्रात बुथ क्रमांक ३७८ ते ३८३ मतदान बूथवर १२५८९ पैकी ३२३८ तर दुसऱ्या सत्रात ६४०० शेवटचे सत्रात मध्ये ७४६३ अशा एकूण १२५८९ पैकी महिला मतदार ३६६४ तर पुरुष मतदार ३८०७ असे एकूण मतदान ७४७१ झाले तर ५९.३४% टक्के इतके मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत पोलीस प्रशासन,शिक्षक, व नगरपालिका कर्मचारी संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवून होते. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यमान आमदार व उमेदवार मकरंद पाटील यांनी देखील महाबळेश्वर मधील सर्व मतदार केंद्र धावती भेट देत कार्यकर्त्यांना मतदारराजा,प्रशासनाचे आभार मानत मार्गस्थ झाले शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता महाबळेश्वर शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.