दहिवडी (वार्ताहर )-
पक्ष आणि अजित पवार सांगतील तसे लढू : अनील देसाई
माण-खटाव तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याप्रमाणेच आम्ही निवडणूक लढवू, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माण-खटाव तालुक्यातील नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केले.
दहिवडी येथील संपर्क कार्यालयात बोलत आयोजित बैठकीदरम्यान ते होते. यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
अनिल देसाई म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजून वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र परिस्थितीनुसार आम्ही स्वबळावरसुद्धा लढण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी अजित पवार आणि महायुतीतील वरिष्ठ नेते जे ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही योग्य निर्णय घेऊ.
बैठकीच्या शेवटी देसाई यांनी उपस्थित पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आगामी निवडणुकांमध्ये लोकशाहीचा सन्मान राखत पक्षाची भूमिका काय असेल, याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
….