अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत सर्व समाजाने सत्यशोधक पद्धती प्रमाणे विवाह करावेत – आशा ढोक
धायरी/पुणे . फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या धायरी फाटा येथील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे विश्व सम्राट बळीराजा गौरव दीन म्हणजेच बलिप्रतिपदा दिनी रात्री 7 वाजता अल्पशिक्षित सत्यशोधक सागर नागेश नाशिककर आणि सत्यशोधिका भाग्यश्री सोमनाथ कर्डक यांचा आंतरजातीय विवाह कुटुंब मान्यतेने समाजप्रबोधन करीत अती अल्प खर्चात संपन्न झाला. यावेळी वधू वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र तसेच थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम तसेच संसारोपयोगी भांडी,मिक्सर कपडे , डबे,चौरंग वगैरे साहित्य संस्थेचे अध्यक्ष व विधीकर्ते तसेच महात्मा फुले साहित्य चरित्र,साधने व प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे नि.सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विश्वस्त प्रा. सुदान धाडगे यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.निवृत्त शिक्षिका सुधा धाडगे यांनी संसारोपयोगी साहित्य मोफत भेट दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर भास्कर, व हा विवाह घडवून आणणारी समाजसेविका सौ. पूनम आवळे, धोंडाबाई क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातील सागर आणि भाग्यश्री यांचे केंद्रामध्ये आगमन राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय घेऊन फुलांच्या पायघड्यावरून आगमन झाले त्यानंतर त्यांचे शुभहस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर आयोजक व विधीकर्ते रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक चळवळी विषयी तसेच महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म का स्थापन केला याविषयी आणि फुले एज्युकेशन संस्थेतर्फे तेलंगणा राज्यासह महाराष्ट्र भरात आज चा विवाह धरून 54 व 15 वास्तू पूजन सोहळे पार पाडल्याचे सांगून असे विवाह अधिक घडावेत यासाठी मौलिक मार्गदर्शन करीत हे विधीकार्य पार पाडले तर सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टके चे गायन केले.
याप्रसंगी सागर आणि भाग्यश्री यांना ढोक यांनी सात वचने देत सात फेऱ्या मारत समई वात प्रज्वलीत करीत त्यांचे कडून शपथ पत्राचे देखील वाचन करून घेतले. मोलाचे सहकार्य आकाश व क्षितिज ढोक , सौ.उर्मिला क्षीरसागर यांनी केले .यावेळी वर वधूचे आईला राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले तर कार्यक्रमाचे आभार केंद्राचे व्यवस्थापक सत्यशोधिका आशा ढोक यांनी मानत समाजात आर्थिक उधळपट्टी न करीता असे साधेपणाने अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत ,धाडगे सर यांचे सारखे देणगीदार पुढे आले तर जास्तीजास्त सत्यशोधक विवाह आमची संस्था देशभर मोफत कार्य सुरु ठेवेल असेही म्हटले.