पंढरपूर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

Spread the love

खुनाचा कट रचनाऱ्या दोघांना कंबरेला पिस्टल लावून फिरत असताना पंढरपुर शहर पोलीसांनी घेतले ताब्यात.

पंढरपूर वार्ताहर

दिनांक ०७/०५/२०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जुना कासेगाव रोड पंढरपुर येथे मोटार सायकली वरून येत असताना पोलीसांनी गराडा घालुन जागीच पकडले. पकडलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव ०१) समीर अमर पवार रा. जुना कांसेगाव रोड समर्थ नगर पंढरपूर, ०२) शिवम सुनील अधटराव रा. हनु‌मान मैदान जवळ पंढरपूर तसेच दुसऱ्या मोटार सायकली वरती असलेला व पळून गेलेला इसम नामे ०३) यश ज्ञानेश्वर अंकुशराव रा. कोळी गल्ली पंढरपूर तसेच आरोपी क्र. ०४) गोपाळ अंकुशराव रा. पंढरपूर असे असल्याचे सांगीतले दोन्ही मिळून आलेल्या अ.क्र. ०१ व ०२ यांचेकडे कमरेचे उजव्या बाजूस प्रत्येकी एक लोखंडी देशी बनावटीचे दोन पिस्टल, दोन मॅक्झीन व चार जिवंत काडतुस याचेसह मिळून आले आहेत. पकडलेले इसमास पिस्टल वापरण्याचा परवाना बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने त्यास पंढरपुर शहर पोलीस ठाणेस आणून पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.३१०/२०२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम-३, २५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१ (२) तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे.सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री प्रितमकु‌मार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री डॉ. अर्जन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीकांत घुगरकर, पोसई महादेव पिसाळ, सपोफौ कल्याण ढवणे, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह १४८८ कुंदन कांबळे, पोह १६३८ हांगे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोशि १२१६ शुहानी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकों १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे, पोकों ५१४१ नवगिरे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोकों स्तन जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!