अजित जगताप
मेढा दिनांक महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री
मंत्री असलो तरी जावळीकरांसाठी तसेच माझ्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघासाठी सदैव मी बाबाच असणार आहे. सातारा – जावलीकरांसाठी कधीच मंत्रीपदाचा आव आणणार नाही अशा शब्दात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जावळीकरांना आपलेसे केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल जावळी तालुक्याच्या वतीने त्यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन मेढा ता.जावली येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पुनर्वसन व मदत मंत्री नामदार मकरंद पाटील उपस्थिती होते . वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जावळीचे नेते वसंतराव मानकुमरे, विजय शेलार, कांतीबाई देशमुख, पांडुरंग जवळ, विकास देशपांडे, दत्ता वारागडे,दत्ता गावडे, मोहसीन शेख, इमरान अल्ताफ शेख, संजय पवार, राजेंद्र शिंदे,संदीप पवार, रवींद्र परामणे, शिवाजी गोरे, अनिल शिंदे , गट विकास अधिकारी निलेश पाटील, बापूराव पार्टे, तहसीलदार हणमंत कोळेकर, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. संपतराव कांबळे, प्रवीण कांबळे, दत्ता अण्णा पवार, अर्चना रांजणे, गीता लोखंडे, निर्मला दुधाने, रुपाली वारागडे, यांच्यासह शेती उत्पन्न बाजार समिती व ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक संचालक, पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे जावळी तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी सातारा येथे जाऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शुभेच्छा दिल्या.
सातारा व जावली तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत असल्यामुळे सर्वांना सामावून घेण्यामध्ये यश मिळाले आहे. जावली तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर,मुऱ्यादऱ्यांवर सर्वत्र रस्त्यांची कामे मार्गे लागली आहेत. आता शेतीसाठी पाण्याची मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. यासाठी बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे. तसेच पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. महू हातगेघर धरण कालव्याचे काम सुरू असल्याने शेतीला पाणीपुरवठा होणार आहे. असे स्पष्ट करून नामदार भोसले पुढे म्हणाले,
मेढा शहर दिवसेंदिवस वाढत चालले असून मेढ्याच्या परिपूर्ण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने मोठी योजना राबवण्याचा संकल्प आहे. महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला प्रथमच चार मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे त्याचा फायदा सातारा जिल्ह्याला नक्कीच होत आहे.
पुनर्वसन व मदत मंत्री मकरंद पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे आदर्श मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मानले जाते. त्यांची गरुडासारखी नजर मतदारसंघावर आहे . सामान्य माणसांचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून होत आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे वडील माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यामुळे उरमोडी धरण झाले असून त्यांच्या दुष्काळाचा कलंक मिटला आहे. असे मत सुद्धा मंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, अरुणा शिर्के, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत मंत्री भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेढ्याचे युवा नेते संतोष वारागडे, विकास देशपांडे, पांडुरंग जवळ, कांतीबाई देशमुख, रामभाऊ शेलार, विठ्ठल देशपांडे, नरेंद्र कोकरे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी तसेच शिवेंद्रसिंहराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जावली तालुक्यातुन विविध गावचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच हजारो नागरिक उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला . या कार्यक्रमाला जावलीकरांच्यावतीने वही तुला करून मंत्री महोदयांना शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मेढा तालुका जावळी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मान्यवर (छाया- अजित जगताप, मेढा)
