म्हसवड: वार्ताहर
रमजान ईद निमित्त जनश्री फाउंडेशनच्या वतीने म्हसवड येथील मुस्लिम बांधवांना उपवास निमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते खजूर वाटप शुभारंभ करण्यात आले
मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्त दरवर्षी जनश्री फाउंडेशनच्या वतीने नासपचे जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे हे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी ईद निमित्त रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांना खजुराचे वाटप करत असतात
यावर्षी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते जनश्री फाउंडेशन च्या वतीने म्हसवड शहरातील मुस्लिम बांधवांना खजूर वाटप शुभारंभ करण्यात आला यानंतर शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन फाउंडेशन च्या वतीने खजूर वाटप करण्यात आले व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या
म्हसवड शहरांमध्ये विविध सण समारंभामध्ये सुनील पोरे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्व जाती धर्मामध्ये सणसमारंभ मध्ये नेहमीच मदत करत असतात त्यांच्या या कार्याबद्दल मुस्लिम बांधवांनी पोरे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या
नामदार जयकुमार गोरे यांनी जनश्री फाउंडेशन चे सर्वेसर्वा इंजिनियर सुनील पोरे व टीम यांच्या या व अशा सामाजिक उपक्रमाबदल अभिनंदन केले
