म्हसवड : करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या वतीने आयोजित भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ सौ. सोनिया गोरे (मा. ना. जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभ होता, ज्यामध्ये म्हसवड परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. सुवर्णा पोरे, सौ. अंजली भागवत, राजलक्ष्मी पोरे, अँड. गौरी पोरे यांचा समावेश होता. उपस्थित महिलांनी हळदी-कुंकवाच्या माध्यमातून एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत पारंपरिक उत्साह साजरा केला.कार्यक्रमादरम्यान भाजप सदस्यता अभियानाचे उद्दिष्ट आणि महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.कार्यक्रमाचे आयोजन करणभैय्या सुनील पोरे मित्र समूहाच्या सहकार्याने बाळासाहेब पिसे, बाबू मुल्ला, सागर चव्हाण, विकास लोखंडे, आणि सौ. पानसंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. शेवटी आभार प्रदर्शन अँड. शुभम पोरे यांनी केले.महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
