(अजित जगताप )
मेढा दि: अधिकाऱ्यांकडून कामे झालीच पाहिजेत. संवेदना दाखवणे महत्त्वाचे आहे. येणारा प्रत्येक माणसाने सांगितलेले काम होईल असे नाही पण ऐकून घेतले तर त्या माणसाची समाधान वाटेल. त्यामुळे त्याची ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या अधिकारात आहे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला तर आम्ही पाठपुरावा करू पण , सामान्य माणसाचे ऐकूनच घेणार नाही. हे आता चालणार नाही अशा शब्दांमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा तालुका जावळी येथे झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. यामुळे खऱ्या अर्थाने आढावा बैठकीचे उद्देश सफल झाल्याचे मानण्यात येत आहे.
जागतिक जल पर्यटन स्थळासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील अनेक प्रकल्प सुरू झालेले आहेत. या ठिकाणी पर्यटनाला चांगली वाव मिळणार आहे. परंतु निसर्ग रम्य जावळी तालुक्यातील मुनावळे येथील स्थानिकांचे सातबारा करून द्यावे. ही जी मागणी आहे याबाबत महसूल उपजिल्हाधिकारी विक्रम चव्हाण यांच्याशी चर्चा करून सातारचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन स्थानिक निर्णय घेतले जाईल. जर शासकीय पातळीवर परवानगी लागत असेल तर त्या ठिकाणीही परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. असे स्पष्ट करून आमदार भोसले यांनी सांगितले. मुनावळे या ठिकाणी स्थानिकांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे. बाहेरच्यांना या ठिकाणी येऊ देणार नाही. असाही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे मुनावळे ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी जावळी तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी विकास कामांबाबत आपल्या समस्या मांडल्या.
मेढा पंचायत समितीच्या आवारात भव्य मंडप टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आढावा बैठकीला जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटी संचालक, चेअरमन व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही अधिकाऱ्यांच्या बद्दल असणारा रोष प्रत्येक ग्रामस्थ व्यक्त करत असल्यामुळे आणि स्वतः मंत्री महोदय यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहिल्यामुळे खऱ्या अर्थाने आढावा बैठक ही खूपच गाजली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, जावळीचे माजी उपसभापती रवी परमणे, सुधीर शिंदे, प्रमोद शिंदे, सुहास कांबळे, समीर शेख ,विठ्ठल देशपांडे, गणेश भोसले, संतोष जाधव, अक्षय गोरे, तुकाराम धनवडे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, बापूराव पाटील, विजय शेलार, राजेंद्र जाधव, निलेश भोसले, अण्णासाहेब देशमुख, आनंदा भोसले, महेश पवार, समाधान गायकवाड, सचिन पाटील यांच्यासह विजय शेलार, आनंदराव जुनघरे, संदीप परामणे, शंकर बेंदे, ज्ञानेश्वर कांबळे, सुरेश मोरे, जगन्नाथ सपकाळ, प्रदीप भालेघरे , श्रीमती गीता लोखंडे, संजय पवार, दिलावर शेख, अन्वर पठाण, बाळासाहेब शिंदे विठ्ठल गोळे, चंद्रकांत गायकवाड तसेच केळघर, करहर, बोंडारवाडी , कुसुंबी बामणोली , सायगाव, आनेवाडी, खर्शी, कुडाळ कुमगाव, सोमद्दी, शेते, सलपाने, संतोष वारागडे, प्रमोद शिवदे, विकास फरांदे, राजू गोळे, जितेंद्र भोसले, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्थानिक पातळीवरील ठेकेदारांनी ही गर्दी केल्यामुळे हा आढावा बैठक सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी असल्याची आठवण अनेकदा त्यांना करून देण्यात आली. याबाबत जावली तालुक्यात चांगलीच चर्चा रंगत आहे. दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत ही आढावा बैठक झाली आहे. या सर्व बैठकीचा इतिवृत्तांत व त्याबाबतच्या पाठपुरावा बाबत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याने ग्रामस्थांना प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बळ मिळाले आहे. जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर व गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी अत्यंत चांगले नियोजन केल्यामुळे या आढावा बैठकीला उशिरापर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळाला.
…….. …………………..
फोटो – आढावा बैठकीत समस्या मांडण्यासाठी झालेली गर्दी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडलेली भूमिका
