
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
स्वराज्य शिक्षक संघ यांच्या वतीने पुसेगाव येथे दिनांक 1.2.2025 रोजी स्वराज्य शिक्षक संघ सातारा जिल्हा यांचे कार्यकारणी ची सभा आयोजित केली होती त्या अनुषंगाने स्वराज शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.फत्तसिंग पवार सर व प्रदेश सरचिटणीस श्री.प्रवीण देवरे सर व कोषाध्यक्ष श्री.विशाल देशमुख सर व राज्य समन्वयक श्री. बेस्के सर,माजी जिल्हाध्यक्ष श्री.बोराटे सर,माजी जिल्हाध्यक्ष श्री.जाधव सर,माजी जिल्हाध्यक्ष श्री.येवले सर हे उपस्थित होते आणि पदाधिकारी सातारा जिल्हा कार्यकारणी सभेसाठी हजर होते. त्यावेळी स्वराज्य शिक्षक संघ सातारा जिल्हा अध्यक्षपदी श्री. मोहनराव बाबुराव माळवे प्राथमिक आश्रम शाळा निंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली तर सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री.सेवा रामचंद्र गडकरी व श्री. विनय उत्तमराव गायकवाड यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व इतर 11 सदस्यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन कार्यकारणी मध्ये नियुक्ती करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील बहुसंख्येने स्वराज शिक्षक संघाचे सभासद उपस्थित होते.
सर्वानुमते ही कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असणारे स्वराज शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. फत्तेसिंग पवार सर यांचा सत्कार व आभार श्री.देशमुख सर प्राथमिक आश्रमशाळा औंध यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .