
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
औंध येथील राजा भगवंतराव जुनिअर कॉलेजमधील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी सई संदीप यादव हिला द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा.निलेश तांबे सातारा ता. पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, मा. नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा,मा. संदीप भिंगारे बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा, मा.शशिकांत गोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातारा, मा. दिपाली खोत अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मा. रुपाली सावंत द यु. प. संघ महिला राज्य अध्यक्ष, मा. शिवाजीराव महाडिक मा. जि. परिषद अध्यक्ष, मा. अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द.यु. ग्रा. पत्रकार संघ महाराष्ट्र, मा. जीवन मोहिते द यु. ग्रा. प. संघ राज्य उपाध्यक्ष, मा. महेश यादव द यु.ग्रा. जिल्हा उपाध्यक्ष व इतर पत्रकार उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये सामाजिक, साहित्यरत्न, क्रीडारत्न, कृषीरत्न, उद्योगरत्न, आरोग्यरत्न, समाजरत्न, सरपंचरत्न, शिक्षणरत्न,अशा समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी सई हिचे औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी, संस्थेच्या व्हा. चेअरमन चारुशीलादेवी, विश्वस्त, सचिव, सहसचिव, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.