माण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ना.गोरे यांचे अभिनंदन- राजु मुळी
दहिवडी वार्ताहर
इतिहासात प्रथमच सातारा जिल्ह्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाच मंत्रिपदे देण्यात आल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.चारही आमदार मंत्रीपदीचे दावेदार होते.त्यातील तिघे प्रथमच मंत्रीमंडळात सहभागी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारचेच आहेत. जयकुमार गोरे माण खटाव,शंभूराज देसाई पाटण,शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जावली,मकरंद पाटील वाई खंडाळा महाबळेश्वर अशा सहा मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याने सातारा जिल्ह्याचा मान महायुतीने ठेवलेल्याची चर्चा राज्यात रंगू लागली आहे.
यातच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी ना.जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करून येत्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय घ्यावेत अशी मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत होती.परंतु जयकुमार गोरेनी मंत्री पदाची शपथ घेताच त्यांनी ना.गोरेंचे अभिनंदन करून लोकहिताचे,शेतकऱ्यांच्या फायद्याचे,प्रत्येक घटकाला न्याय मिळेल असे निर्णय घ्यावेत.महाराष्ट्र धर्माचे पालन करत योग्य ते निर्णय घ्यावे अशी आशा आहे.शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी चांगले काम करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.