
दुचाकीची दुचाकीस पाठीमागुन धडक एकजण ठार तर एकजण जखमी |
म्हसवड दि. ५
म्हसवड येथील पंढरपुर रोडवरुन दुचाकीवरुन घरी निघालेल्या एकास पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेने झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे.
या बाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी येथील महावीर कोंडीबा कलढोणे रा. कलढोणे मळा हे शेतकरी असुन ते अठवडी बाजारात भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर रोज सकाळी दूध वाढण्यासाठी शहरातही येत असतात. दि. ४ रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील व घरातील कामे आटोपुन म्हसवड शहरात दुध वाढण्यासाठी आले होते, शहरात त्यांनी रोजचे दुध वाटप ही केले, त्यानंतर शहरातील त्यांची कामे करुन ते घरातील गँस सिलेंडर आणण्यासाठी गेले त्याठिकाणी गेल्यावर त्यांनी तो गँस सिलेंडर आपल्या दुचाकीवरुन ( टी.व्ही.एस. एक्सल ) घरी घेवुन निघाले असता ते येथील पंढरपुर रस्त्याजवळील एका मंदिरानजीक आले असता पाठीमागुन भरधाव आलेल्या दुचाकीची त्यांच्या दनचाकीस जोरदार धडक बसली, ही धडक एवढी जोरात होती की त्यामुळे महावीर हे दुचाकीवरुन उडुन डांबरी रस्त्यावर पडले त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. तर पाठीमागुन धडक दिलेल्या दुचाकीवरील एकाचा पाय फ्रँक्चर झाला आहे. त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सदर अपघाताची खबर म्हसवड शहरात पसरताच अनेकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली, याठिकाणी उपस्थित डॉक्टरांनी महावीर यास मृत घोषित केल्याने त्यांच्या परिवाराने व मित्ररिवाराने फोडलेला हंबरडा ह्रदय पिळवटुन टाकणारा होता. यावेळी अनेकांचे डोळेही पानावले. अपघातामध्ये मृत पावलेला महावीर हा एक अजात शत्रु व्यक्ती म्हणुन सुपरिचित होता. त्याचा मित्र परिवार ही मोठा असल्याने अनेकांना त्याचे असे अपघाती जाणे हे चटका लावणारे ठरले. महावीर कलढोणे अत्यंत बोलक्या स्वभावाचा असल्याने अठवडा बाजारात त्याची भाजी ही सर्वा अगोदर संपत होती त्याचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबध होते, खुप मेहनतीने त्याने आपली शेती फुलवली होती तर त्यातुनच त्याने आपल्या दोन्ही मुलींची लग्ने लावुन दिली होती त्याच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबावर अक्षरशा दु:खाचा डोंगर कोसळला असुन त्याच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा व मोठा मित्र परिवार असुन आज ही महावीरच्या अपघाती जाण्याची हळहळ सर्वत्र होत आहे.
फोटो –