सेवा पंधरावडा साजरा – सौ. बाबर

Spread the love


म्हसवड ( महेश कांबळे)
महसूल राजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासन सेवा पंधरावडा साजरा करण्यात आला अशी माहिती अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी दिली.

महसूल विभाग कामकाज लोकभिमुख व गतिमान करणेसाठी महाराष्ट्र शासन तर्फे राष्ट्रनेता श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
सेवा पंधराव्या अंतर्गत पानंद रस्ते खुले करणे त्यांचे सीमांकन करणे सर्वांसाठी घरकुल व पोट खराब क्षेत्र लागवडीखालील आणणे तसेच विविध प्रकारचे लाभ जनतेला देणे यासाठी म्हसवड, तालुका माण  याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान  26/92025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर तहसील कार्यालय म्हसवड यांचे मार्फत नियोजन करणेत आले आहे .
या कार्यक्रमास  मा.  श्री जयकुमार गोरे मंत्री ग्राम विकास व पंचायत राज्य महाराष्ट्र राज्य याच्या पत्नी सौ सोनियाताई गोरे , उपविभागीय अधिकारी माण खटाव  उज्वला गाडेकर   याच्या उपस्थित घेणेत आले.
महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग व इतर शासकीय विभाग मार्फत 1057 लाभार्थी यांना लाभ देणेत आला. इतर उपस्थित मान्यवर श्री विकास आही र  तहसीलदार माण. मीना बाबर अप्पर तहसीलदार म्हसवड,  लिंगे तालुका कृषी  अधिकारी, डॉ. सचिन माने मुख्याधिकारी म्हसवड, श्री विजय धट माजी नगराध्यक्ष म्हसवड, श
अप्पासाहेब पुकळे, लाडकी बहीण योजना अध्यक्ष, श्री विजय सिन्हा माजी नगराध्यक्ष म्हसवड,  डॉ.वसंत मासाळ माजी नगराध्यक्ष म्हसवड,  दिपक खाडे सहाय्यक गटविकास अधिकारी,शेंडगे महसूल नायब तहसीलदार, व इतर लोकप्रतिनिधी व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गावातील लाभार्थी व पत्रकार बंधू  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!