भाळवणी येथील युनियन बँकेत कर्मचारी वाढवण्याची खातेदारांची मागणी ,अन्यथा बँकेस टाळे ठोकण्याचा खातेदारांचा इशार
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी येथील बँकेत कर्मचारी वाढवावेत अशी मागणी करणारा ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला आहे.
या ठरावाचे निवेदन सरपंच रणजीत जाधव व वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते शाखाधिकारी बालाजी हारके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच रणजीत जाधव म्हणाले की या बँकेत भाळवणी सह, केसकरवाडी, शेंडगेवाडी, धोंडेवाडी, जैनवाडी, महीम, तांदुळवाडी आदि गावातील खातेदारांना येथील बँकेतच व्यवहार करावा लागत आहे .या बँके शिवाय या परिसरात दुसरी को तसेच साखर कारखाना,शासकीय कार्यालय,महाविद्यालये,व्यापारी,शेतकरी , कामगार,सेवानिवृत्ती धारक,यांची गर्दी कायम राहत आहे.वाढत्या खातेदारांचा विचार करता कर्मचारी वर्ग खूपच कमी आहे त्यामुळे खातेदारांना वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.
तरी तात्काळ कर्मचारी वर्ग वाढवावा अन्यथा खातेदारांनी बँकेस टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
चौकट – पासबुक प्रिंट करून मिळावे.एटीएम मशीन इतर ठिकाणी सुरू करावी.सोने तारण कर्ज योजना सुरू करावी.शेती,व्यवसाय कर्ज योजना सुरू करावी.शासकीय योजनांची माहिती फलक दर्शनी भागात लावावेत. एटीएम,चेक बुक तात्काळ मिळावे.