जेवायला वाढले नाही म्हणून मुलाने केला आईचा खून

Spread the love

.

दहीवडी पोलिसांनी आरोपीला एक तासात केले जेरबंद.

दहिवडी प्रतिनिधी,ता.११:
पिंगळी बु.(ता.माण )
येथील ३४ वर्षीय युवकाने शुक्रवार दि.१० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा हंडा आईच्या डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली.
दारूच घेते आई वडिलांचा व मुलाचा जीव या घटनेप्रमाणे. दारूच्या नशेच्या आहारी गेलेला विशाल आनंदराव जाधव (वय ३४) हा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यावेळी आई (संगीता आनंदराव जाधव. वय ६० वर्ष )या झोपल्या होत्या. तो आईला म्हणाला मला जेवायला वाढ त्यावर आई म्हणाली की तू रोज दारू पिऊन येतोय मी तुला जेवायला वाढणार नाही. हाताने घेऊन खा असे म्हटल्यामुळे त्याला एवढा राग आला की त्याने दारूच्या नशेत जवळच असलेला पाण्याचा हंडा उचलला व चार ते पाच वेळा आईच्या डोक्यामध्ये जोरदार मारला. त्यामुळे आईच्या डोक्यामध्ये जोरदार वार झाले आणि रक्तप्रवाह वाहू लागला. नंतर नातेवाईकांनी संगीता यांना दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी हलविले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले. सातारा येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्यानंन्तर नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.व दहिवडी शोककळा पसरली.
दहिवडी पोलिसांनी घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित घटनेची सखोल चौकशी करून. जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या नराधमास लपून बसलेला असताना देखील एक तासांमध्ये त्याला जेरबंद केले.

फोटो…
दहिवडी :अटकेत असलेला आरोपी विशाल जाधव(वय३४वर्ष )समवेत सपोनि. अक्षय सोनवणे व पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!