म्हसवड वार्ताहर

माण तालुक्यातील पावसाचे थैमान सर्व शाळांना सुट्टी देण्याची माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांची प्रशासनाकडे मागणी करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे ही याबाबत दुरध्वनी वरून सुट्टी जाहीर करावी अशी विनंती केली आहे.
माण तालुक्यात पावसाने हाहाकार माजला असून संततदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पावसामुळे परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाच्या मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
शासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करून माण तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विचार करून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी माजी नगराध्यक्ष नितीन शेठ दोशी यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.
याबाबत नितीन दोशी यांनी म्हसवडचे मुख्याधिकारी सचिन माने, म्हसवड चे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, माणचे तहसीलदार सचिन अहिरे, म्हसवड चे अप्पर तहसीलदार सौ. मीना बाबर , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे खासगी सचिव अभिराज काळे गटशिक्षणाधिकारी माण तालुका यांचेकडे म्हसवड व परिसरातील शाळा सुट्टी जाहीर करून विद्यार्थ्यांचे संभाव्य धोके ओळखून व आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.