म्हसवड दि. २६
राज्यातील सर्व धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश करुन या समाजाला एस.टी. प्रवर्गाचे दाखले द्यावेत अशा मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी धनगर समाज बांधवांची आंदोलने सुरु आहेत या आंदोलनाची दखल शासनाने घेवुन धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी म्हसवड पंचक्रोशीतील धनगर समाज बांधवांकडुन करण्यात आली, यावेळी या समाजाकडुन अपर तहसिलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात आले.
यळकोट, यळकोट जय मल्हार चा जय घोष करीत येथील धनगर समाज बांधवानी डॉ. प्रमोद गावडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातुन हलगीच्या निनादाद रँली काढत तहसिलदार बाबर यांच्याकडे निवेदन सपुर्त केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. गावडे म्हणाले की धनगड व धनगर ही जमात एकच आहे मात्र सरकार यामध्ये आमच्या समाजाची दिशाभुल करुन फसवणुक करीत आहे. या समाजाचे अनेक बांधव विविध ठिकाणी आंदोलने करीत आहेत, मात्र त्याकडे शासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे, या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला इशारा देत आहोत की धनगर समाजाची शासनाने सुरु केलेली अवहेलना थांबवावी व या समाजाच्या हक्काची मागणी पुर्ण करावी अन्यथा या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पोहचेल तेव्हा मात्र सरकारी पळता भुई थोडी होईल याची गंभीर दखल शासनाने घ्यावी असा निर्वानीचा इशारा ही यावेळी डॉ. गावडे यांनी दिला.
यावेळी लाडकी बहिण योजनेचे मान – खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, माजी नगरसेवक सोपानकाका विरकर, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, युवा नेते विजय बनगर, लुनेश विरकर, डॉ. सुरेश मासाळ, इंजि. दादासाहेब दोरगे या सह मोठ्या प्रमाणावर धनगर समाजबांधव उपस्थित होते.
धनधनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक -म्हसवड शहरात घुमला यळकोट, यळकोट चा नारा