तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
दहिवडी: (माणदेशी वृत्तसेवा)
रामोशी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामधून आरक्षण मिळावे, यासाठी दहिवडी येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय परिवर्तन संघाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.तिसऱ्या दिवशीही शेकडो बांधवांनी उपोषणात सहभाग घेतला. याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील बेरड, रामोशी समाज विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो; परंतु राजकीय सत्तेत वाटा नको म्हणून विमुक्त जमाती हा प्रवर्ग तयार करून मूळच्या क्रिमिनल ट्रायब्ज असलेल्या बेरड, रामोशी समाजाला त्यामध्ये समाविष्ट केले. हा महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय आहे.
बाँबे गॅझेट, हैदराबाद गॅझेटमधील अनेक पुरावे, शासकीय अहवाल, शासनाने नियुक्त केलेले आयोग यावरून कर्नाटकमधील बेडर आणि महाराष्ट्रातील बेरड, रामोशी एकच आहेत, हे स्पष्ट होते.
मग कर्नाटकमधील बेडर समाज अनुसूचित जमातीमध्ये येतो, मग महाराष्ट्रातील बेरड, रामोशी समाज हे विमुक्त जमाती मध्ये कसे? तरी महाराष्ट्रातील बेरड, रामोशी समाजाचा. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करून हा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी या उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपोषणाला मोहन मदने, आनंदा चव्हाण, गोरखनाथ गोफणे, दिलीप चव्हाण, धनाजी जाधव, अजित शिरतोडे, राहुल मदने, बाळासाहेब जाधव, गुलाब भंडलकर, रवींद्र नाईक, सचिन पाटोळे, विक्रम चव्हाण, बबन बोडरे, अप्पासाहेब बुधावले, बामसेफ संघटनेचे बाबासाहेब भोसले, राष्ट्रीय जनता पक्षाचे संदीप खरात, संदीप फणसे, विरभद्र कावडे, आबासाहेब जाधव,वामन जाधव,विशाल चव्हाण , मायणी आदी मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवीला.
उमाजी नाईक यांचे वंशज उपोषणात सामील.
उमाजी नाईक यांचे थेट वंशज चंद्रकांत बाळासो खोमणे,अमोल बाळासो खोमणे, अमोल चंद्रकांत खोमणे, विशाल चंद्रकांत खोमणे, आबा कांबळे, श्रमिक पोमण,सचिन राजेंद्र जाधव,कराडचे बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब दादाराम जाधव, आदी मान्यवर ही उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.
दहिवडी :एस टी आरक्षणासाठी उपोषणास बसलेले रामोशी समाज बांधव
