म्हसवड नगरपरिषदेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर
२० प्रभागांपैकी १० महिला व १० पुरुषांसाठी आरक्षण — ८ प्रभाग आरक्षित, १२ सर्वसाधारण
म्हसवड माणदेशी न्यूज वृत्तसेवा
म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (2025) सदस्यपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, या आरक्षणामुळे नगर राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. नगरपालिकेच्या 20 प्रभागांपैकी 10 प्रभाग महिला तर 10 प्रभाग पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या 20 प्रभागांपैकी 12 प्रभाग सर्वसाधारण तर ८ प्रभाग हे आरक्षित आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी 3 जागा तर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या तीनपैकी दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण पडले असून, एक प्रभाग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात तीन महिला व दोन पुरुष असे आरक्षण निश्चित झाले आहे.
सभागृहात पार पडली आरक्षण सोडत
म्हसवड नगरपरिषदेच्या सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडली. या वेळी प्रांताधिकारी सौ. उज्वला गाडेकर आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन माने उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोडतीची चिठ्ठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली, ज्यामुळे पारदर्शकतेचा आणि लोकशाही परंपरेचा आदर्श दाखविण्यात आला.
प्रभागनिहाय मतदारसंख्या व परिसर
एकूण दहा प्रभागांमध्ये 23358 मतदार नोंदले गेले असून, त्यात विविध समाजघटकांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 1
एकूण मतदार – 1915
यामध्ये अनुसूचित जाती महिले साठी 1 व सर्वसाधारण एक खुला प्रवर्ग साठी आहे
या प्रभागात शेटे वस्ती, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उद्यमनगर (1), पिसे वस्ती आणि कारंडे वस्ती यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 2
एकूण मतदार –2272
या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे
मासाळवाडी परिसर, लोखंडे वस्ती, ढोक मोडा, बोंबाळे वस्ती, मानेवाडी, राऊतवाडी इत्यादी भागांचा समावेश.
प्रभाग क्रमांक 3
एकूण मतदार –2406
या प्रभागात अनुसूचित जाती एक जागा व सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा आरक्षित आहे
भांदुर्गे वस्ती, कलढोणे वस्ती, नारायण सरतापे वस्ती, कोल्हे वस्ती, शेरी मळा, बेगर वस्ती, हिंगणी रस्ता, माळावरील मातंग वसाहत, वाक वस्ती आणि खरा मळा.
प्रभाग क्रमांक 4
एकूण मतदार – 1989
या प्रभागामध्ये अनुसूचित जाती च्या महिलेसाठी एक जागा व सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित आहे
मणेरबोळ, नेहरू पथ, भंडारेबोळ, मोमीन गल्ली, चांभार गल्ली, लोटके वस्ती, यात्रा मैदान परिसर, काजीमळा, बनसोडे वसाहत, उद्यमनगर या भागांचा समावेश.
प्रभाग क्रमांक 5
एकूण मतदार – 2567
या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एक जागा तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी एक जागा आरक्षित आहे
रामोशी गल्ली, जनावरांचा दवाखाना, गोपी कॉर्नर, सिद्धनाथ पथ, चौंडेश्वरी मंदिर, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, मेत्रे वाडा, माळी गल्ली, पिंजारी परिसर.
प्रभाग क्रमांक 6
एकूण मतदार – 2139
या प्रभागामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा तर सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा आरक्षित आहे
सिद्धनाथ हायस्कूल परिसर, मासाळ टेक, त्रिगुणी बोर्ड, महात्मा गांधी पथ, मोडाचे हॉस्पिटल ते कासारबोळ, राजवाडा, नाभी गल्ली, सुतार गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसर.
प्रभाग क्रमांक 7
एकूण मतदार – 2596
या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एक जागा व सर्वसाधारण खुल्या गटासाठी एक जागा आरक्षित आहे
सोसायटी हाऊसिंग सोसायटी, सूर्यवंशी वस्ती, चोपडे वस्ती, एस.टी. स्टँड, श्रीराम मंदिर परिसर, जुनी नगरपरिषद, बाजार पटांगण, जुने पोस्ट ऑफिस परिसर.
प्रभाग क्रमांक 8
मतदार संख्या 1809
या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एक व सर्वसाधारण खुला गट एक जागा आरक्षित आहे
शेंबडे वस्ती, खांडेकर वस्ती, काळा पट्टा, तावशे वस्ती, पवार वस्ती, पंतवाडी परिसर यांचा समावेश.
प्रभाग क्रमांक 9
एकूण मतदार – 2808
या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी एक जागा व सर्वसाधारण खुल्या गटासाठी एक जागा आरक्षित आहे
मसाईवाडी परिसर, नागोबा मंदिर परिसर, कबीर वस्ती, बोरे वस्ती, गुरव वस्ती, दहिवडे मळा, बिरोबा मंदिर, झगडे वस्ती, कवठे वस्ती, मेगासिटी, बनगरवाडी.