नाझरे मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करा… शेतकऱ्यांची मागणी, नाझरे येथे स्वयंचलित हवामान प्रजन्यमापक यंत्र बसवा..



सांगोला प्रतिनिधी
नाझरे व परिसरात सध्या गेली दोन-तीन दिवस झाले रात्रंदिवस पाऊस बरसत असून, मसवड येथेही पाऊस भरपूर झाल्याने मान नदी दुथडी भरून वाहत आहे व सध्या मच्छी वरून पाणी सुरू आहे तसेच बेलवण, गोंदिरा, खिचडी इत्यादी ओडे ही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत व सध्या शेतकऱ्यांच्या रानात पाणी उभे राहिले आहे. त्यामुळे नदी नाले यावरून प्रवास करू नका व आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा तसेच शेतकऱ्याने आपली व जनावराची काळजी घ्या व नाझरे येथील बंधाऱ्यावरून येणारी जाणारी वाहतूक बंद करा अशा सूचना तलाठी मधुकर वाघमोडे यांना कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी नाझरे येथे मान नदीवरील बंधाऱ्याची पाहणी करताना दिल्या व नाजरे येथील मान नदीवरील बंधाऱ्याची पाहणी केली.
नाझरे मंडल व परिसरात अतिवृष्टी झाल्याने येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे व शेतकऱ्यांच्या रानात पाणी उभे राहिले आहे व त्यामुळे डाळिंब, अन्य पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे नाझरे मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करा व हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने दादासो वाघमोडे यांनी कृषी अधिकारी जाधव यांना केली, तसेच पंचनामे सुरू करा व तातडीने मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
नाझरे येथे स्वयंचलित हवामान प्रजन्यमापक यंत्र नसल्याने येथे किती पाऊस झाला याचे प्रमाण समजत नाही व पावसाची नोंद होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तरी त्वरित यंत्र बसवा व शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या व नाजरे मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करा अशी मागणी रविराज शेटे यांनी यावेळी कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्याकडे केली. तरी त्वरित यंत्र बसवण्याची व्यवस्था करू अशी ग्वाही दिपाली जाधव यांनी यावेळी दिली. यावेळी नाझरे, वझरे, चिनके, अजनाळे, बलवडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.