पाऊस थांबला, पण पाणी उपसा सुरुच

Spread the love

म्हसवड: महेश कांबळे..

म्हसवड शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड एस.टी. बस स्थानक ते शिंगणापुर चौक या दरम्यान असलेल्या अनेक दुकांनामध्ये पाणी शिरुन या परिसरातील व्यापार्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, म्हसवड शहरात रवीवारी पावसाने उघडीप दिली असली तरी येथील दुकानांमध्ये शिरलेल्या पावसाच्या पाण्याचा उपसा दुसर्या दिवशीही सुरुच असल्याचे दिसुन आले.


म्हसवड येथील शिंगणापुर चौकातील श्रीराम बजारमध्ये अचानक शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे येथील किराणामाल मोठ्या‌ प्रमाणावर भिजुन या बजारचे मोठे नुकसान झाले आहे, तर एस.टी. स्टँड परिसरातील ढालेमामा कॉम्पलेक्स मधील बेसमेंट मध्ये असलेल्या करडे फ्लेक्स मध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील बेसमेंटच्या गाळ्यांमध्ये अद्यापही पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असुन‌ ते पाणी उपसण्याचे काम अद्यापही सुरु आहे.
दरम्यान काल झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड शहरात पाणीच पाणी झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी महसुल विभागाने करीत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे, तर या नुकसानग्रस्त व्यापार्यांना मदत म्हणुन तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांनी तात्काळ तीन मडपंप पाठवुन देत पाणी उपसा करण्यास मोठी मदत केली आहे. तर त्यांच्या भगिणी सुरेखा पखाले यांनी म्हसवड शहरात येवुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
रविवार दि.२८ रोजी सकाळी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे येवुन नुकसान झालेल्या व्यापार्यांची भेट घेवुन त़्यांना शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले.
तर शेखर गोरे यांनी पाठवलेल्या ‌मडपंपाद्वारे दुसर्या दिवशी ही या परिसरातील बेसमेंटचे पाणी उपसण्याचे काम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!