
(कुमारी नारायणी जाधव)
सातारा दि:
सातारा जिल्हा धनुर्विद्या संघटना व शिवांतीका आर्चर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सब ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा सातारा येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीच्या कुमारी नारायणी संजय जाधव हिने रिकर्व या प्रकारात चमकदार कामगिरी करत दि २८ फेब्रुवारी रोजी डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्य अजिंक्य पद स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
कुमारी नारायणी जाधव हिने आर्चरी या खेळासाठी दृष्टी आर्चरी अकॅडमीचे प्रवीण सावंत, सहाय्यक मार्गदर्शक शिरीष ननवरे व सायली मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एन पवार , वर्ग शिक्षिका पाटील मॅडम व क्रीडा शिक्षक गोकुंडे सर यांनी कौतुक केले. तिचे मूळ गाव गोवे तालुका जिल्हा सातारा हे आहे. तिच्या या यशाबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.