मिलिंद काळे महाबळेश्वर सातारा
*जागतिक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेने हम सब एक है! चा नारा देत मोठ्या जल्लोषात व आनंदात श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला .
राज्यसह देशांमध्ये एकाच मुद्द्यावर भर देत.सर्वच राजकीय पक्षाने धर्माचे झेंडे पुढे करत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. व निवडणुकीतही याचा परिणाम झाला असला तरी सुद्धा या महाबळेश्वर शहरांमध्ये कोणत्याच प्रकारचा प्रभाव, पडला नाही पडणार नाही.याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी राज्यांमध्ये विविध ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सवात साजरी झाली.त्याचप्रमाणे महाबळेश्वर मधील स्थानिक महाबळेश्वर हिंदू व मुसलमान नागरिक एकत्र येत, श्री दत्त जयंती उत्सव समितीची स्थापना करून, महाबळेश्वर मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आली.श्री दत्त मंदिरावर व परिसरात विजेची आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळपासूनच चालक-मालक यांनी आपल्या टॅक्सी व्यवसायाला आजच्या दिवस पूर्णविराम देत मंदिरामधील विविध धार्मिक विधीसाठी जातीन उपस्थित होते.सकाळपासून सुरू असलेल्या श्रीचाअभिषेक, होम हवन,व सत्यनारायण भगवान यांच्या पुजे व अशा सर्व विधीसाठी सर्वच टॅक्सी धारक उपस्थित होते.संपूर्ण दत्त मंदिर परिसर श्री दत्त नावाचे भक्तीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम स्मरणात तल्लीन झाला होता.सकाळ पासूनच श्री दत्त मंदिरा मध्ये भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती.तालुक्यासह,शहरातील विविध भजनी मंडळांनी आपल्या सुस्वर भजनातून श्रींची सेवा करत श्रोत्यांची मणे जिंकली.छत्रपती श्री संभाजी महाराज वाहनतळाच्या खालच्या मजल्यावर भाविकांसाठी भोजन बैठक व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी महाप्रसाद आस्वाद घेतला.यावेळी श्री दत्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव,उपाध्यक्ष युसूफ मुजावर, कार्याध्यक्ष अनिल पार्टे, सचिव संतोष डोईफोडे,महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जावेद मुजावर,उपाध्यक्ष बबन ढेबे, सेक्रेटरी सी.डी. बावळेकर,आजी-माजी संचालक,वाहन चालक-मालक व महिला,पुरुष,युवक,युवती, आबालवृद्ध व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.