- श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय घोष भाविकांच्या उत्साहात साखरवाडी खामगाव येथे दत्त जयंती उत्साहात साजरी
मायणी प्रतिनिधी श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्तधाम पाच सर्कलवाडी खामगाव साखरवाडी येथे दत्त जयंती भाविकांच्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातारा सोलापूर पुणे फलटण निरा लोणंद या भागातील भाविकांनी या तीर्थक्षेत्री एकच गर्दी केली होती दत्तधाम दत्त मंदिर येथे हजारो भाविकांचे उपस्थितीत श्रीच्या पाळण्यावर भाविकांनी अबीर गुलाल व फुलांची उधळण करत दत्त जयंती साजरी करण्यात आली दत्त नवरात्र उत्सव आठ डिसेंबर पासून सुरू झाला होता यामध्ये गुरुचरित्र पारायण, काकड आरती, दत्त उपासना, नवचंडी याग, सत्यदत्त कथा, श्री सत्यनारायण महापूजा, तसेच अनेक भजनी मंडळाचा कार्यक्रम दत्त पालखी सोहळा, इत्यादी कार्यक्रम संपन्न झाल्यावर दत्त जयंती दिवशी सकाळी पाच वाजता अभिषेक महापूजा, माधुकरी, गो स्वान अश्व पृथ्वी वृक्ष यांची पूजा त्यानंतर दत्त या कार्यक्रम पार पडला हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबिर, मोफत कॅन्सर शिबिर, सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात आली दत्त जन्म सोहळ्यास भाविकांनी एकच गर्दी केली स्त्रीला पाळण्यात घालून पाळणा म्हटला गेला तसेच रात्रंदिवस देवा तुझी मूर्ति ध्यानात त्याचा लागेना अंत अशी अनेक भक्ती गीते म्हणण्यात आली त्यानंतर दत्त दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या हा कार्यक्रम हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी दत्तू उपासक परमपूज्य गुरुवर्य महत उमेशानंद महाराज सरस्वती यांच्या व्यवस्थापना खाली स्वयंभू श्री दत्त मंदिर सेवा मंडळ, यांनी विशेष परिश्रम घेतले होते