
सातारा दि: सातारा जिल्ह्यात आज खऱ्या अर्थाने महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जयंतीच्या स्वरूप पाहण्यास मिळाले. स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करण्यासाठी गरीब व शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व मान्यवरांच्या हस्ते मोफत मार्गदर्शक पुस्तिका मिळाली. आणि अनेकांनी खऱ्या अर्थाने १३४ वी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी केली. या विधायक उपक्रमाची आता सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला होता. आज या संदेशाचे अनुकरण करणारी पिढी सध्या केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा देत आहे. नाचून नव्हे तर वाचून जयंती साजरी करा. असा मौलिक सल्ला अनुभवी आंबेडकर अनुयायांनी दिला होता. कारण, अलीकडच्या काळामध्ये वाढत्या बेरोजगारीमुळे बॅनरबाजी, डी.जे. बाजी यामुळे एक पिढी भरकटून गेलेले आहे. त्यांना ज्ञानाचे महत्व पटवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे.परंतु ,त्यांचा डी.जे. व डॉल्बी मध्ये जीव अडकल्यामुळे सध्या त्यांना शासकीय सेवेतील वय निघून गेल्यानंतर उपजीविकेसाठी रोजंदारी करावी लागणार आहे. हे विदारक चित्र बदलण्यासाठी ज्यांना शिक्षणाची आवड आहे. अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या रेल्वे, विमान सेवा, वायुसेना ,जलसेना, थलसेना भरती बोर्ड ऑनलाइन परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक ,पोलीस दल आणि यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. अशा विविध क्षेत्रांमध्ये भरतीपूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शक पुस्तिका अत्यंत आवश्यक आहे.
यासाठीच सामाजिक कार्याची आवड असणारे श्री रमेश अनिल उबाळे यांनी स्वखर्चाने सर्व गोष्टीला फाटा देऊन हजारो विद्यार्थ्यांच्या हाती मार्गदर्शक पुस्तिका दिल्यामुळे भविष्यात सातारा जिल्ह्यातील किमान गरीब घरातील शंभर मुलं गुणवत्ता यादीत येऊन आयुष्यभर डॉ. आंबेडकर जयंती साजरी केल्याचे समाधान नक्कीच मिळवतील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खटाव तालुक्यात डॉ. प्रियाताई महेश शिंदे, डॉ .अरुणा बर्गे, रमेश उबाळे त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विधाते, सातारा जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे, निलेश नलवडे, निलेश यादव , संतोष जाधव यांच्या हस्ते या संपूर्ण मार्गदर्शक पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले.
त्यानंतर खटाव, कोरेगाव, सातारा तालुक्यातील शास्त्रीनगर ( खटाव) ,ललगुण, शिरढोण, यशवंत अकॅडमी वॉटर स्टेशन (कोरेगाव) मराठा अकॅडमी पाटकळ माथा, प्रतापसिंह नगर, खेड (ता. सातारा) या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या टप्प्यात या गावातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना भरती बोर्ड ऑनलाइन परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकेचा संच देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित भागांमध्ये पुस्तके वितरित केले जाणार आहे. जे संपर्क स्वातील त्यांना घरपोच पुस्तके उपलब्ध करण्याचाही त्यांनी मानस व्यक्त केला आहे.
पीपल्स रिपब्लिक पार्टीचे नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व युवा नेते जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रमेश उबाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात वर्षभर हा विजय उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या या कृतीमुळे खऱ्या अर्थाने आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजले आहे .अशा शब्दांमध्ये प्रा. परसप्पा बागल, जयदीप फाउंडेशनचे जयदीप शिंदे, प्रदीप बोतालजी, राजेश मोरे, साहिल माने, दत्ता कांबळे , वाशिम इनामदार, उत्तम गायकवाड, चंद्रकांत उबाळे व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर युगपुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून या उपक्रमाचे केलेल्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंतीनिमित्त पहिल्या टप्प्यामध्ये 134 विद्यार्थ्यांना भरती बोर्ड ऑनलाइन परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका तसेच अंकगणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरण नवीन ऑनलाइन पॅटर्न यांच्या समावेश असलेले मराठी भाषेतील संच देण्यात आला. या उपक्रमाचे महाराष्ट्रातून नामावंत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्तिशः संपर्क साधून मनःपूर्वक आभार मानले आहेत. या उपक्रमाबद्दल सातारा जिल्ह्यातील चार मंत्री व चार आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याची भावना व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे आज सातारा शहरातील नामांकित सेवाभावी उद्योजक व विविध कंपनी तसेच पल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचे फलक लावले आहेत. त्याचेही समाजातून कौतुक होत आहे.
फोटो सातारा जिल्ह्यामध्ये परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करताना प्रियाताई शिंदे व प्रदीप विधाते, रमेश अनिल उबाळे व मान्यवर (छाया- निनाद जगताप कोरेगाव