
सातारा प्रतिनिधी – श्री. जे.के.काळे यांचेकडून:-
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनचे राज्य अध्यक्ष श्री विलास कुमरवार, जनार्दन मुळे कार्याध्यक्ष ,दयानंद एरंडे सरचिटणीस तसेच राज्य उपाध्यक्ष राजन लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने दिनांक 16 पासून उपोषण करणार असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री जेके काळे यांनी प्रसिद्धी माध्यमात दिली आहे.
ग्रामपंचायत कामगार यांना वेळेवर वेतन मिळत नाही तसेच राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी भत्ता सेवा पुस्तक अद्यावत नाही तसेच दहा महिन्यातील वेतनाचा फरक अद्याप मिळाला नाही तसेच जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती करत असताना संघटनेला विचारात घेतले जात नाही जिल्हा परिषदेतून सुटणारे वेतन प्रत्यक्ष कर्मचारी यांच्या हातामध्ये येण्यासाठी तब्बल 50 ते 55 दिवसांचा कालावधी लागतो ग्रॅज्युटी ऍक्ट लागू करणे इत्यादी मागण्यासाठी दिनांक 16 पासून सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी माहिती दिली आहे या आंदोलनामध्ये काही अपरित घटना घडल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या उपोषण दरम्यान सातारा जिल्ह्यातून कमीत कमी सातशे कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.