
औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे
माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी अखंड आयुष्यभर मानव मुक्तीचा लढा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया आनंदोत्सवात साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचे ज्येष्ठ बंधू अंकुश गोरे आणि औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी उपसरपंच दीपक नलवडे, वसंत मेजर, अलीम मोदी, बाबा गोसावी, गणेश देशमुख, नवल थोरात, राजू देशमुख, शिवाजीराव रणदिवे, मंगेश इंगळे, सावता यादव, सुखदेव इंगळे,चंदू पवार,संतोष जायकर, गणेश चव्हाण,हे सर्व गावातील प्रमुख मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होती. यावेळी सर्व मान्यवरांची जनतेला संबोधित आपले विचार व्यक्त केले.अंकुश गोरे बोलताना म्हणाले की, औंध येथील आंबेडकरवादी जनतेला सर्वात मोठे बुद्ध विहार बनवू , व हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी प्रोत्साहन देऊ असा विश्वास दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम सदस्य तानाजीराव इंगळे यांनी केले आणि मान्यवरांचे आभार समता युवक संघ औंध अध्यक्ष उपाध्यक्ष आणि औंध मधील संपूर्ण आंबेडकरवादी जनतेकडून करण्यात आले.
