म्हसवड प्रतिनिधी
माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी येथे शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे या साठी बालबाजार व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता .संस्थेच्या संचालिका व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सौ सविता वसंत मासाळ मॅडम व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या हस्ते बालबाजार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्या सौ राजश्री नितीन दोशी(भाभी )उपस्थित होत्या.सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी बाजारामध्ये पालेभाज्या ,फळभाज्या तसेच खाऊ पदार्थ व इतर पदार्थ विक्रीस घेवून आले होते .याचा लाभ सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी घेतला. गावातील गावकरी ,महीला ,विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासाळवाडी चे विद्यार्थी,शिक्षक आवर्जुन उपस्थित होते.
बालबाजार बरोबरच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता,यादरम्यान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच शिक्षिका यांच्यासमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला . शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यावहारांतून विकास होऊ शकतो ते ज्ञान बालबाजारतुन मिळते, संस्थेने चांगला उपक्रम राबविला असे प्रतिपादन म्हसवड चे माजी नगराध्यक्ष व अहिंसा नागरी सह पतसंस्था मर्यादित म्हसवड चे चेअरमन श्री.नितीन दोशी (भाऊ)म्हणाले ,उपस्थित सर्वांचे स्वागत संस्था प्रमुख डॉ.वसंत मासाळ व व्यवस्थापकीय संचालक श्री रावसाहेब मासाळ यांनी केले. बालबाजार लहान मुला मुलींनी गजबजून गेला . संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाल बाजार पार पाडण्यास प्रयत्न केले. सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.



