

म्हसवड प्रतिनिधी —
कवि संमेलनाने माण तालुका झाला मंत्रमुग्ध
माजी आमदार, कविवर्य धोंडीराम वाघमारे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त काल,मंगळवार २८ जानेवारी रोजी संध्याकाळी वडजल तालुका माण येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. माण तालुक्याच्या इतिहासातील हे पहिले वहिले कवि संमेलन अत्यंत मनमोहक वातावरणात पार पडले. या कवी संमेलनास ज्येष्ठ कवि श्री. विठ्ठल वाघ (अकोला),कवी व संपादक श्री. विजय चोरमारे (कोल्हापूर), डॉ. सुरेश शिंदे (करमाळा), श्रीमती.संजीवनी तडेगावकर(जालना),श्रीमती लता ऐवळे (सांगली),भरत दौंडकर (पुणे),श्री.रमजान मुल्ला (नागठाणे), श्री.इंद्रजित घुले (मंगळवेढा) श्री. हनुमंत चांदुगडे (सुपे) अशा महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून हि सर्व कवी मंडळी आली होती.
तसेच माण तालुक्यातील धोंडीराम दादांवर प्रेम करणारे शेकडो लोकं माण व फलटण परिसरातून उपस्थित होते. ज्येष्ठ कवि श्री.विठ्ठल वाघ यांनी धोंडीराम वाघमारे यांच्या हुंदका या काव्यसंग्रहातील खेड्यातला भारत दिल्लीला कसा कळणार, कळला असता तर आला आता आकार’ या कवितेचे विश्लेषण केले व धोंडीराम वाघमारे यांच्या कर्तुत्वाला उजाळा दिला. मंत्रिपद नको पण माझ्या दुष्काळी माण तालुक्याला पाणी द्या म्हणणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार होऊन गेला आणि तो म्हणजे धोंडीराम वाघमारे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय धोंडीराम वाघमारे यांनी केले व आभार श्री. राजेंद्र शेलार यांनी मानले,सुत्रसंचालन डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. सर्व प्रिंट मीडिया,डिजिटल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच विशेषतः वडजल गावातील समस्त ग्रामस्थ बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.