
( अजित जगताप)
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, पूजा बनसोडे, दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, पत्रकार हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, अजित जगताप ,अमित वाघमारे, अरुण जावळे, विठ्ठल हेंद्रे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पत्रकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप अन्नदान शीतपेय व भोजनदान असे विविध कार्यक्रम झाले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भिसे, अमोल गंगावणे, अरुण पवार, गुलाब बनसोडे, शिवाजी जाधव, सिद्धार्थ कांबळे, हेमंत भोसले, ऋषिकेश गायकवाड, सतीश कांबळे, प्रज्वल मोरे, चंद्रकांत खंडाईत, सतीश जाधव, सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, निलेश घुले यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आज युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

फोटो -१) साताऱ्यात डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर… २)सातारा पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करताना पत्रकार बंधू (छाया- निनाद जगताप सातारा)