म्हसवड चे बुलडोझर मॅन…डॉ.सचिन माने….

Spread the love

म्हसवड ( विजय टाकणे -पाटील..)…
मुख्याधिकारी नव्हे बुलडोझर मॅन म्हसवड मधील मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे साधा सुटसुटीत दिसणारा साधा भोळा हा माणूस खरंतर जबरदस्त प्रशासन शक्ती असणारा आहे याच्यावर कुणाचा विश्वास नाही बसणार …पण हे खरं आहे म्हसवड येथील नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी म्हसवड शहरांमध्ये अशक्य ते शक्य करून दाखवले आहे..
अनेक वर्षाची अतिक्रमण तर काढलीच पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते स्वतःच्या कौशल्याने बिन त्रासाची बिना भांडण न करता अतिक्रमण काढतातच…..
म्हणून आता त्यांनी त्यांची ओळख ठरलेली आहे… बुलडोझर मॅन बुलडोझर मॅन म्हणून त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून नवीन प्रतिमा तयार केलेली आहे. …
अतिशय साधा दिसणारा हा माणूस फार कमी बोलतो आणि जे बोलतो ते कधीच करत नाही…. आणि जे करतो ते कधीच बोलत नाही …
अशी त्यांची ओळख आहे गेल्या साडेतीन वर्षांमध्ये म्हसवड शहरांमध्ये त्यांनी आपली एक नवीन ओळख तयार केलेली आहे सतत कामात असणारा हा माणूस कधीही कुणाशी वाईट बोलत नाही किंवा कुणाशी वाद घालत नाही… आपलं काम भलं आणि आपण …
अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे ते पशुवैद्यकीय पदवीधर आहेत
म्हणजेच डॉक्टर आहेत …
जरी ते जनावराचे डॉक्टर असले तरी माणसाचे वर इलाज उत्तम करतात…
असं नवे कार्यक्रम करत असतात…. सतत हसतमुख असणारा हा माणूस कधी कुणाला दुखावत नाही गेलेल्या प्रत्येक माणसाला गोड बोलून शांत करणारा हा माणूस आतून मात्र जबरदस्त इच्छाशक्ती असणार आहे आणि म्हणून की काय दोन वेळा त्यांची बदली होऊन सुद्धा मान तालुक्याचे जालनायक जयकुमार गोरे यांनी त्यांना पुन्हा एकदा मसवड येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी कार्यरत करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने नियुक्ती केली..
नुकत्याच झालेल्या पावसानं मसवड शहराचा चेहरा बदलून टाकलेला होता आणि कुणाची कसलीही वाट न बघता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन आणि पोलिसांना बरोबर घेऊन मसवड शहरातील असणारी अतिक्रमणे धडाक्यात काढून टाकले आणि त्यांच्या याच कार्यक्रमामुळे ते प्रकाशित होता मध्ये आलेले आहेत असाच त्यांनी अतिक्रमण राबवण्याचा धडाकेबाज कार्यक्रम केला आणि यामध्ये त्यांनी 50 ते 60 वर्ष जुनी असणारी अतिक्रमण एका दिवसात काढून टाकली आणि साऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं नावलौकिक झाला अनेक वेळा अधिकारी आपलं काम बरं आणि आपण बरं असंच म्हणत असतात पण डॉक्टर सचिन माने हे एक कसलेले खेळाडू आहेत योग्य वेळेला संधी मिळाली की बॉलवर सिक्स मारायचा आणि मग कुणालाच कळत नाही त्यांचा सिक्स मैदानाबाहेरच गेलेला असतो.
म्हसवड शहरात सुरू असणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या कामांमध्ये त्यांनी आपलं स्किल दाखवलेलं आहे सतत ठेकेदाराशी गोड बोलून अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करून घेतात.
आणि म्हणूनच की काय ठेकेदारांमध्ये ते सुद्धा प्रिय झालेले आहेत आणि ठेकेदाराकडून अतिशय चांगलं काम करून घेण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे.
आणि त्यांच्यावर प्रचंड असा विश्वास ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा आहे आणि म्हणूनच की काय त्यांना आता पुन्हा एकदा म्हसवड शहराचे प्रशासक ,मुख्याधिकारी म्हणून संधी देण्यात आलेली आहे .
आणि या संधीचा सोनं केल्याशिवाय ते राहणार नाहीत अशा या बुलडोझर मॅन ला म्हसवड कर यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा…
…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!