
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी लाल किल्ला दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्राच्या लोकनृत्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 18 वर्षाच्या पुढील मुलांमधे शिवम विष्णू इंगळे याची निवड झाली आहे
‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’ यांच्या सहाय्याने 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवण्यासाठी कलावंत म्हणून शिवम विष्णू इंगळे याची निवड झाली आहे.यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून सातारा जिल्ह्यातून औंध ता.जि.सातारा येथील रहिवाशी आहे.त्याच्या या निवडीबद्दल सातारकर व औंध ग्रामस्थांनी शिवमचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
या कोळी नृत्यामध्ये असलेली शिवम विष्णू इंगळे हा 29 डिसेंबर 2024 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सतत सराव करीत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वतः ची छाप पाडण्यासाठी मिळालेल्या संधीबाबत या कलाकारावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा गावाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. शिवम इंगळे सुरुवातीपासूनच सांस्कृतिक विभागात नेहमीच कलागुणांना वाव देऊन सतत यश संपादन केले आहे.या शिवमला आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली आहे.या गौरवपूर्ण प्रसंगाने शिवमचा नावलौकिक वाढला असून त्याला पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे वडील श्री विष्णू इंगळे व आई राणी विष्णू इंगळे यांचे सुरुवातीपासूनच मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.त्याचबरोबर त्याची पत्नी पायल शिवम इंगळे यांनी शिवमच्या कलेला खूप मोठा पाठिंबा आहे.सुरुवातीपासूनच नृत्य ,गायन,चित्रकला,रांगोळी आंतरराषट्रीय, राष्ट्रीय, फेस्टिवल इत्यादी क्षेत्रात – तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर नेहमी नेहमी यश संपादन केले आहे.शिवम हा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आहे तसेच त्याच्या नावाने २६ तास सलग नृत्याचा वर्ल्ड रेकॉर्ड (विश्वविक्रम)आहे. अनेक पुरस्कारांचा मानकरी देखील आहे.त्याने आपली गुणवत्ता उत्कृष्टपणे टिकवून ठेवण्यात यशस्वीपणे भूमिका पार पाडली आहे.