
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
आंतरराष्ट्रीय मानवअधिकार राजदूत संघटना ग्लोबलपीस कॉन्सिल माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यामध्ये सौ निशा लोहार यांना भारत बुक ऑफ रेकॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार हा निशा लोहार यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन देण्यात आला आहे समाजाप्रती असणारी त्यांची तळमळ समाजाप्रती असणारे योगदान या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी घेण्यात आला होता. पुरस्कार हा संघटनेचे अध्यक्ष माननीय संस्थापक डॉ. सकुंडे सर आणि डॉक्टर आदित्य पतंगराव यांच्या हस्ते देण्यात आला व सौ निशा लोहार यांना शुभेच्छा देण्यात आल्या मिळालेल्या पुरस्कारामुळे सौ निशा लोहार यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे