मायणी प्रतिनिधी—
—मायणी येथे रविवारी पासून सिद्धनाथाची यात्रा सुरू होत आहे अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी दिली श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवाची यात्रा सिद्धनाथ मारुती देवस्थान ट्रस्ट मायणी श्री सिद्धनाथ यात्रा समिती व ग्रामपंचायत मायणी यांच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत येत्या रविवारी सकाळी 11 वाजता अंबवडे, कणसेवाडी, नरबटवाडी मासाळवाडी व बोनेवाडी या या गावचे गजी मंडळ व गजीचा कार्यक्रम करणार आहेत संध्याकाळी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी देवाचा छबिना निघणार आहे दोन डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी या देवाची विधिवत पूजा केल्यानंतर सकाळी सिद्धनाथ रथोत्सवास प्रारंभ होणार आहे हा रथोत्सव युवा नेते सुरेंद्र गुदगे व मानकरी विकास देशमुख यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे सायंकाळी बाजार पटांगणावर आर्केस्ट्रा चा कार्यक्रम होणार आहे 3 डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी दोन तानाजी भोसले वाघरीकर यांचा लोकनाट्य तमाशा व दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान भारत माता विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे सिद्धनाथ मारुती देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक सुरेंद्र गुदगे, विकास देशमुख बळवंत पोरे, सुधाकर कुबेर, सरपंच सोनाली माने, उपसरपंच डी एस कचरे उपस्थित राहणार आहे चार डिसेंबरला बैलगाड्या मैदान होणार आहे अशी माहिती रावसाहेब देशमुख यांनी दिली