सावता महाराज प्रतिष्ठान तर्फे नवनिर्वाचित आमदार बापु पठारे आणि सत्यशोधक ढोक सन्मानित

फुले दांपत्य यांचे विचार आत्मसात करून समाजाने कृतीशील बनावे – सत्यशोधक रघुनाथ ढोक
वडगावशेरी/पुणे – श्री.संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान ,वडगावशेरी पुणे च्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या 134 व्या स्मृतिदिनानिमित वडगावशेरी चे नवनिर्वाचित आमदार बापु पठारे यांचा सत्कार अध्यक्ष पुंडलीक लव्हे आणि महाराष्ट्र आणि परराज्यात सामाजिक व सत्यशोधक चळवळीतील भरीव योगदानाबद्दल सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा सत्कार आमदार बापु पठारे यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन दि.28 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजता सावता महाराज मंदिर ,गणेशनगर वडगावशेरी येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी मंदिरासाठी योगदान देणारे सोपानराव गलांडे ,भाऊसाहेब कोल्हे परसुराम जगताप आणि बाळासाहेब भुजबळ यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार बापु पठारे म्हणाले की खऱ्याअर्थाने ज्ञानाची गंगा फुले दाम्प्त्यामुळे अवतरली असून आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत याचे सर्व श्रेय फुलेना जाते. परंतु आजचे निवडणुकीचे निकाल पहाता सुशिक्षित कोण आणि यापूर्वी आपल्या देशासाठी व महारष्ट्रसाठी ज्या महापुर्षानी दिलेले योगदान आणि केलेले कार्य याचा देखील विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे कितीही चांगले काम केले तरी देखील लोक विसरून जातात काही कारणाने नाराज होतात पण वास्तव खरी परीस्थिती प्रमाणे समाजाने वागावे असे देखील म्हंटले.
या प्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी म्हंटले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि इतर महापुर्षानी केलेले कार्य आता सर्वाना माहिती झाले आहे. आता त्यांच्याकार्यातील योग्य धागा पकडून सर्व समाजाने कृतीशील कार्य स्वतः पासून सुरु करून आपल्या कुटुंबात सत्यशोधक कार्य तसेच विधी कार्य करून सामाजिक समानता , स्री चा सन्मान करायला शिकणे काळाची गरज आहे. सत्यशोधक विवाह केल्याने कर्मकांड ,अंधश्रद्धा आणि मुहुर्थ याला मूठमाती तर दिली जातेच सोबत 365 दिवसातील कोणताही दिवस सोयीने निवडून आर्थिक खर्च कमी करून एखादा सामाजिक उपक्रम राबविला तर त्यांचा खूप मोठा आनंद व मानसिक समाधान मिळत असते.तसेच या विवाह पध्दतीमध्ये ठराविक पुरोहित मक्तेदारी मोडीत काढल्याने होणारे आर्थिक नुकसान होत नाही आणि हा विवाह कोणताही स्री पुरुष लावू शकतो असे देखील ढोक म्हणाले.
यावेळी जेष्ठ समाजसेवक बबनराव साबळे ,मारुतराव गलांडे आदींनी देखील फुले दाम्पत्याच्या कार्यास उजाळा दिला.आणि आता यापुढे कृतीने कार्य करावे असे देखील म्हंटले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष पुंडलीक लव्हे यांनी केले तर सूत्रसंचालन रामदास आल्हाटसर आणि आभार दिलीप लोंढे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळी देखील उपस्थीत होते.