इंजिनिअर सुनील पोरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

Spread the love

म्हसवड (वार्ताहर )-


म्हसवडचे सुपुत्र इंजिनिअर सुनील पोरे यांना नामदेव समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून 1 डिसेंबर रोजी पुणे येथे
सहकार व विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
म्हसवड येथील समाजसेवक इंजिनियर सुनील पोरे यांनी म्हसवड मध्ये अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. दुष्काळी परिस्थितीमध्ये माणगंगा नदीला पाणी सोडण्यासाठी उपोषण असेल किंवा सातारा पंढरपुर हाईवेचे रखडलेले काम पुर्ततेसाठीचे उपोषण असेल किंवा कोरोना काळात माणुसकीचा धर्म म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देवून पोरे कुटुंबीयांनी अहोरात्र मदत करून माणुसकीचा धर्म पाळण्याचे कार्य केले आहे या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना श्री संत नामदेव शिंपी समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत त्यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिंपी समाज एक संघ केला व नुकताच महाराष्ट्र शासनाने शिंपी समाज महामंडळाची स्थापना केली यामध्ये पोरे यांचे मोठे योगदान आहे
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नामदेव व्हिजन फाउंडेशन पुणे यांच्यावतीने नामदेव समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून एक डिसेंबर रोजी पुणे येथे नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून संजय शेठ सासेलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश देवळे नासप राज्यध्यक्ष संजयजी नेवासकर सचिव अजय फुटाणे नासप मुख्यविश्वस्थ राजेंद्र पोरे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!