साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

(अजित जगताप)
सातारा दि: अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपविलेल्या विमान अपघाताने २४१ प्रवाशांसोबत निवासी डॉक्टर आणि विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना आज सातारा शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणाहून एअर इंडिया कंपनी विमानाने उड्डाण केले आणि अपेक्षित उड्डाण न गाठताच ते वैद्यकीय महाविद्यालयाचे वस्तीगृहात कोसळले. त्यामध्ये निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे व काही जण जखमी झाले. ही सर्वात दुर्दैवी घटना आहे. या अपघातामुळे खऱ्या अर्थाने अनेकांच्या स्वप्नाची राख रांगोळी पाहण्यास मिळाली. या सर्व मृत्यूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृह मध्ये शिवसेना नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, पहिला संघटिका शारदा जाधव, सैनिक फेडरेशनच्या विद्या बर्गे, विराज खराडे, विकास शिंदे, रणजितसिंह भोसले, माजी सैनिक व शिवसैनिक निकम, गोडसे, विश्वासराव माने, निलेश मोरे, विजय पाटील, राजेंद्र माने, गणेश भोसले, राजेंद्र घाडगे, डॉ. धैर्यशील माने, संगीता पवार, विमल सुपनेकर ,प्रिया झांजुर्णे, रूपाली शिंदे, मुमताज मुलाणी, नीलम येवले, सुनीता देवी सावंत, सीमा गायकवाड ,कांचन घोरपडे, सुवर्णा पाटील, माया चौधरी, विजया कोळेकर, नीता काटकर, साधना भोसले ,रूपा लेंभे, आशा वीर ,नंदिनी गायकवाड, नीता दणाणे ,उमा जाधव, उज्वला अहिरे, साधना भोसले, आसमा मुलाणी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळेला मान्यवरांनी मानवता भावनेतून श्रद्धांजली वाहिली.
केंद्र व राज्य सरकार जखमींवर उपचार करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी या घटनेनंतर जखमेवर उपचार व्हावा व इतर मदत कार्यासाठी परिश्रम घेत आहेत. याची माहिती देण्यात आली. अहमदाबाद ते लंडनला निघालेल्या विमान अपघाताने अनेकांचे स्वप्न भंगले असले तरी नव्या जिद्दीने पुन्हा उभा राहण्याचे बळ मिळो. तसेच मृत्यू आत्म्याला शांती लाभो. यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली व दोन मिनिटे स्तब्धता राखून श्रद्धांजली वाहिली.


फोटो सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना पदाधिकारी व महिला श्रद्धांजली वाहताना (छाया– अजित जगताप, सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!