म्हसवड येथे संविधान दिन साजरा

Spread the love

म्हसवड प्रतिनिधी

लोकांनी लोकांसाठी लोक कल्याणासाठीच चालवलेली लोकशाही मध्ये कोणी छोटा मोठा गरीब श्रीमंत सर्वांना जगण्याचा, बोलण्याचा, समान वागणुकीचा अधिकार संविधानाच्या रुपात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १८ दिवसात ३९५ कलमांचे संविधान म्हणजे वकीललांचे नुसते दस्तऐवज नव्हे तर तेच संविधान आहे या संविधानाचा आज आपन ७५ वा वर्धापनदिन आपन साजरा करत आहोत असे मत प्राचार्य प्रविण दासरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले
भारतीय संविधान दिनानिमित्त म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये संविधान दिना निमित्ताने प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाचे व प्रस्तावनेचा वाचन यावेळी करण्यात आले, व मुलांकडून प्रस्तावना लिहण्याची स्पर्धा लावण्यात आली, मुलांकडून सार्वजनिक प्रस्तावनेचा वाचन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक प्रतिनिधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनी यावेळी उपस्थित

म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याठिकाणी भारतीय संविधानाचा ७५ वा वर्धापनदिना निमित्ताने मुलांकडून प्रस्ताववाचे वाचन करण्यात आले तर कुमार सरतापे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले

नगरपालिके मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
भारतीय संविधानाच्या वर्धापनदिन निमित्त पालिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांचे हस्ते करण्यात आले यावेळी पालिका कर निरीक्षक सुवर्णा विभुते , लेखापाल शितल गुजर, पवार मॅडम, चव्हाण मॅडम, नितीन सरतापे, नितिन लोखंडे,सागर सरतापे, रोहित बारवासे, कांबळे, जाधव शिवराज भोसले , आनंदा केसकर खंदारे आदी उपस्थित होते म्हसवड मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!