म्हसवड शहरात एका रात्रीत ६ घरे फोडली, सपोनि अक्षय सोनवणे यांचे समोर नवं आव्हान?

Spread the love

म्हसवड (प्रतिनिधी )एल. के. सरतापे…
अज्ञात चोरट्यांनी म्हसवड येथील शिक्षक काॅलनी परिसरातील ६ बंद घराचे कुलुपे तोडून घरफोडी केली आहे. यामुळे नुतन पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे.

म्हसवड शहरा लगत असलेल्या शिक्षक काॅलनी या परिसरात उच्चभ्रु ,नोकरदार, व सोने चांदीचे व्यवसायिक मंडळी वास्तव्य करणाऱ्या ची संख्या जास्त प्रमाणात आहे.
काल दि.२६ रोजी बुधवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने या परिसरातील अनेक कुटुंबे परगावी गेले होते. काही लोक मुंबई, व कुंभमेळा याठिकाणी घरांना कुलूप लावून गेली होती . बुधवार व मंगळवारी रात्री चोरट्यांनी या परिसरातील कुलूप बंद घरांना लक्ष करून चोरट्यांनी सहा घरे फोडून सोने चांदीच्या वस्तूसह काही रुपयांची चोरी केल्याची घटना म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली .
परंतु चोरी बाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी नागरीक पुढे आले नाहीत.
या चोरट्यांना पाठीशी कोण घालण्याचा प्रयत्न करतयं याबाबत चर्चा सुरू आहे.

याबाबात अधिक माहिती अशी, कि,म्हसवड पोलिस स्टेशन पासून दिडशे मीटर अंतरावर असलेल्या शिक्षक काॅलनीच्या मागील बाजूस असलेल्या एका बिल्डिंग मध्ये चार कुंटुबे राहतात. एक प्राथमिक शिक्षण विभागात काम करतात ,दुसरे रयत शिक्षण संस्थे मध्ये प्राध्यापक आहेत . ते १५ दिवस कुंटुबासह प्रयागराज, दिल्ली आदी ठिकाणी गेले आहेत. तर तिसरे घर मालक ते मुंबई येथे आपल्या मुलाकडे गेले होते.
या बंद असलेल्या घरांची चोरट्यांनी कुलपे तोडून घरात प्रवेश करुन सामानाची उलथा पालथ केली.
या ठिकाणी दोन्ही नोकरदार मंडळी असल्याने चोरट्यांनी घरे फोडली.
यामध्ये चांदीचे पैंजन,सोन्याचे दागिने चोरले , मात्र लॅपटॉप, प्रिन्टर, टिव्ही आदी वस्तूला हात ही चोरट्यांनी लावला नाही .
तर प्राध्यापक यांच्या घरातून काही रोख रक्कम गेली आहे.
मुंबई येथे गेलेल्या वृध्द दाम्पत्याच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते .तर शिक्षक काॅलनी मधील ओतारी, टॉवर या बिल्डिंग मधे भाड्याने राहत असलेले पशुवैद्यकीय डाॅक्टर यांचे हि बंद घर फोडून सोने चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या तर शिक्षक काॅलनी शेजारील काळा पट्टा नावाच्या शिवारात सातारा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात नोकरीला असलेल्या व सातारा येथे राहत असलेला बंगला चोरट्यांनी फोडला.
त्याच्या हि घरातील किरकोळ वस्तू चोरीला गेल्या तर सहावी चोरी याच वस्तीवर एस टी महामंडळातुन निवृत्त झालेले व सध्या मुलाकडे मुंबई गेले होते. त्यांचा सुध्दा बंगला चोरट्यांनी फोडला.
या सहा ठिकाणी कुलूप बंद बंगला चोरट्यांनी फोडला.
मात्र या सहा घर फोडी बाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कसलीच कल्पना नाही . ज्यांची घरे फुटली त्यांनी व शेजारी राहणाऱ्यानी या बाबत चोरीची तक्रार दिली नाही.
या मागील नक्की कारण काय ?
लोक चोरी झाले नंतर गुन्हे दाखल करण्यास गेल्यावर नागरिकांना त्रास दिला जात असल्याने तक्रार दाखल करण्यासाठी नागरीक पुढे येत नाहीत, अशी चर्चा आहे.?
या मागील खरी वस्तुस्थिती काय याचा शोध नव्याने हजर झालेले अक्षय सोनवणे घेणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ती खरी ठरली आहे .म्हसवड पोलिस ठाण्याचा भार अक्षय सोनवणे पेलणार का ?

मंगळवारी एका रात्रीत सहा बंगले चोरट्यांनी फोडले याचे या परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे जाताना दिसत आहेत.
त्या सीसीटीव्ही फुटेज मधील चोरट्या पर्यंत म्हसवड पोलिस पोचणार का ?
असा प्रश्न निर्माण झाला आहे?
……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!