दहिवडी कॉलेज दहिवडी चे आदर्श प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांची बदली.
कर्तव्यपरायण अधिकाऱ्याचा दहिवडीत निरोप समारंभ;
प्रतिनिधी दहिवडी – चैतन्य नंदकुमार काशिद रयत शिक्षण संस्थेचे सातारा जिल्ह्यातील; माण तालुक्यातील,’दहिवडी काॕलेज दहिवडी’ हे राज्यासह देशातील ”राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” अ ++ श्रेणी (NAAC A++) देशामध्ये चौथ्या क्रमांकाचे माण्यताप्राप्त महाविद्यालय म्हणुन ख्यातनाम आहे. या काॕलेजचे प्राचार्य डाॕ.सुरेश साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये गेल्या २० वर्षेपासून प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळत आपल्या कार्याचा प्रभावी ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्राचार्य डाॕ.सुरेश साळुंखे यांना रयत शिक्षण संस्थेचा “प्रबोधनकार ठाकरे आदर्श प्राचार्य पुरस्कार” पुरस्कार मिळाला आहे.ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी दहिवडी कॉलेज दहिवडी येथे प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला आणि रविवार,दि.१ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची एस.एम.जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे बदली झाली आहे. डॉ.सुरेश तुकाराम साळुंखे दहिवडी कॉलेज मध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सेवीसाठी रुजू झाले.तेव्हापासून आज अखेर मागील तीन वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या गणवत्ता वाढीसाठी डॉ.श्री.साळुंखे यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले. त्यामध्येज्युनिअर कॉलेज साठी डी सी पॅटर्न,नियमित कोर्स बरोबरच वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्स सुरू केले.वेगवेगळ्या बॅचेस करून स्लो लर्नर विद्यार्थ्यांना वेगळे कोचिंग करण्यात आले,यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. याचबरोबरचं भौतिक सुविधा मध्ये “महाराष्ट्र लोकसेवा आयोग”(MPSC) सेंटर विस्तारीत इमारत, आयसिटी क्लासरूम, ई- कटेंट स्टुडिओ, कार्यालय इमारत नूतनीकरण,कॉमर्स विभागामध्ये दोन मजले वाढ,दोन कॉन्फरन्स हॉल तसेच सभागृह आदींच्या निर्मितीमध्ये डॉ.श्री साळुंखे यांनी मोलाचे योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेची धोकमोडा येथील ५० एकर पडीक जमिनीचे पुनर्जीवन करून अर्थात लागवडीयोग्य करून तिथे वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवडी बरोबरचं ज्वारी,बाजरी,मका यांसारखी पिके घेतली.यापैकी तीन एकर क्षेत्रात सध्या ऊस उत्पादन होत आहे. डॉ.श्री.साळुंखे यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयाच्या कॅम्पस क्र.-२ येथे नारळ,बाबू,आवळा,पेरू,तुती,सीताफळ, चिक्कू,आंबा इ.प्रकारची ३,००० पेक्षा जास्त झाडांची लागवड व संगोपन केले आहे. डॉ.श्री.साळुंखे हे महाविद्यालयात सेवा बजवण्यासाठी रुजू झाल्यापासून (ऑगस्ट २०२१ पासून) विद्यार्थ्यांना दरवर्षी झाडांच्या रोपांचे वाटप करतात आणि झाडांची दक्षता व संगोपन कसे करायचे याचे मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत त्यांनी १० हजार पेक्षा जास्त रोपाचे वाटप विद्यार्थ्यांना व परिसरातील वृक्षप्रेमींना केले आहे. “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद”(NAAC ) बेंगलोर ऑफिस यांचे कडून अ ++ (A++) ही अतिउच्च श्रेणी मिळवण्यासाठी आणि सन २०२४ मध्ये केंद्र शासनाकडून पी.एम.उषा योजनेंतर्गत महाविद्यालयाला ५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे,या सर्वांसाठी डॉ.साळुंखे यांनी अपरिमित कष्ट घेतले. या महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास झाल्याने सातारा जिल्ह्यासह , दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीतील विद्यार्थी,पालक यांसह समाजहिताप्रति संवेदनशील असणारे सुजान नागरिक यांच्याकडून प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे कौतुक होत आहे. प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांच्या दहिवडी कॉलेज दहिवडी मधील तीन वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी वृक्ष संवर्धन,कमवा आणि शिका योजना,महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन,महाविद्यालयांच्या पायाभूत सेवा,कौशल्य विकसन कार्यक्रम,राष्ट्रीय सेवा योजना,विद्यापीठीय समित्यांचे कार्य, संशोधक,संशोधन मार्गदर्शक याबाबतीत डॉ.साळुंखे यांनी भरीव योगदान दिले आहे. डॉ.साळुंखे यांची नॅकच्या बेंगलोरस्थित कार्यालयाने “नॅक पिअर टीम”चे सदस्य म्हणून निवड केली आहे. एस.एम.जोशी कॉलेज हडपसर, पुणे या महाविद्यालयात “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” (NACC A +) चे मूल्यांकन होणार असल्याने आदर्श प्राचार्य; एस.टी.साळुंखे यांना याविषयीचा दांडगा अनुभव असल्याने त्यांच्या याचं अनुभवाचा फायदा एस.एम.जोशी कॉलेज हडपसर,पुणे या महाविद्यालयाला व्हावा या उद्देशाने या ठिकाणी आदर्श प्राचार्य; डॉ.एस.टी.साळुंखे यांची बदली करण्यात आली आहे,अशा चर्चा दबक्या आवाजात जनमानसात होत आहेत. आदर्श प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख,संघटक डॉ.अनिल पाटील,सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव बी.एन.पवार,ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, जरनल बॉडी सदस्य डॉ. प्रदिपकुमार शिंदे,सौ. निलिमा पोळ,हर्षदा देशमुख-जाधव, हनुमंत भोसले, सुभाष सस्ते, उपप्राचार्य डॉ.ए.एन.दडस,उपप्राचार्य डॉ.संजय खेत्रे, उपप्राचार्या नंदिनी साळुंखे, प्रा.डॉ.किशोर पवार,कार्यालय अधिक्षक केशव औटे, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षेकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थीनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.