19 रोजी ,औंध मध्ये राजयोग फाउंडेशन आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Spread the love

औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे

औंध : औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री यमाईदेवी यात्रे निम्मित राजयोग फौंडेशन संस्थापक श्री अमर देशमुख यांच्या मार्फत औंध मध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दिनांक 19/1/2025 रोजी औंध मध्ये घेण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध,यांची असणार आहे.स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास आकर्षक टी शर्ट. मेडल.आकर्षक बॅग, सहभाग प्रमाणपत्र आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी साठी प्रश्नांत जाधव -8600880998, तानाजी इंगळे -7769802137,बाबा नांदुगडे – 9075520805, शंभूराजे देशमुख – 9850186007 यांच्याशी संपर्क करावा.स्पर्धेसाठी स्पर्धकांना 200 रुपये एव्हडी नोंदणी शुल्क आकरण्यात आली आहे. वयोगट 16 ते 29 वर्षे पुरुष व महिला प्रथम क्रमांक 7000 रुपये तर दुतीय क्रमांक5000 रुपये, तृतीय क्रमांक 3000 आणि उत्तेजनार्थ रुपये 2000 आशी बक्षीशे असणार आहेत. तर वयोगट 30 वर्षे पुढील सुद्धा बक्षीशे ही वयोगट 16 ते 29 वर्षे प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम 3 विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे.ही स्पर्धा यमाई स्टेडियम औंध येथून चालू होणार आहे. कार्यक्रमासाठी सकाळी झुम्बा डान्स चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धे मध्ये भाग घ्यावा असे आव्हान मा. श्री अमर देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!